आधुनिक तंत्रज्ञानाचा असाही गैरफायदा, AI च्या मदतीने बनवले अश्लील व्हिडीओ; पालघरच्या धक्कादायक घटनेने सर्वच हादरले

आर्टिफिशअल इंटेलिजन्समुळे (AI) तांत्रिक क्षेत्रात अनेक फायदे मिळाले आहेत. मात्र आता याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. AIच्या मदतीने मुलींचे अश्लील व्हिडीओ बनवल्याप्रकरणी दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा असाही गैरफायदा, AI च्या मदतीने बनवले अश्लील व्हिडीओ; पालघरच्या धक्कादायक घटनेने सर्वच हादरले
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा गैरवापर केल्याप्रकरणी अटक
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 11:26 AM

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा (AI) गैरवापर झाल्याची हैराण करणारी घटना (crime news) पालघर येथून समोर आली आहे. येथे एका पोलिस अधिकाऱ्याच्या दोन मुलांनी AI च्या (Artificial intelligence) मदतीने अनेक तरूणी व महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि तो सोशल मीडियावर शेअरही केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर हे गैरकृत्य करणाऱ्या तरूणांना त्या मुलींनी विरोध केला असता त्या नराधमांनी त्यांना मारहाणही केली.

या घटनेनंतर दोन तरूणींनी पोलिसा स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. AIच्या मदतीने आक्षेपार्ह व्हिडीओ बनवण्यात आल्याचे राज्यातील हे बहुतेक पहिलेच प्रकरण आहे, असे पालघर पोलिसांनी नमूद केले. या आरोपींपैकी एकाचे वय 21 तर दुसऱ्याचे वय 19 वर्षे असून त्यांचे वडील मुंबईत पोलीस अधिकारी आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

विरोध केल्यावर तरूणींना केली मारहाण

दोन्ही आरोपींनी महिला आणि मुलींच्या छायाचित्रांमध्ये आर्टिफिशअल इंटेलिजन्स टूलचा (AI) वापर करून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या जाळ्यात सापडलेल्यांपैकी दोन तरूणींनी व्हिडिओबाबत आरोपींकडे आक्षेप व्यक्त केला. मात्र त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्या मुलींना मारहाणल केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलींनी अखेर पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी मुलांवर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा (POCSO) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.