VIDEO : रस्त्याने चालत असताना अचानक वायर तुटली, मोठी दुर्घटना, दोन भावांचा होरपळून जागीच मृत्यू
दोन भाऊ रस्त्याने चालत होते. पण अचानक त्यांच्या डोक्यावर असलेली विजेची वायर तुटली. त्यानंतर मोठी दुर्घटना घडली. तुटलेली वायर ही थेट त्या मुलांच्या अंगावर पडली.
लखनऊ : दोन भाऊ रस्त्याने चालत होते. पण अचानक त्यांच्या डोक्यावर असलेली विजेची वायर तुटली. त्यानंतर मोठी दुर्घटना घडली. तुटलेली वायर ही थेट त्या मुलांच्या अंगावर पडली. यावेळी आग लागली. दोन्ही मुलांचा त्यात होरपळून मृत्यू झाला. ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होतोय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही उत्तर प्रदेशच्या अलीगड शहरात घडली. सिमेंटने भरलेला एक ट्रक विजेच्या खांब्याला धडकला. यावेळी मोठा आवाज झाला. तसेच 11 हजार व्होल्टेजची विजेची तार तुटली. तार तुटल्यानंतर आवाजही आला. पण यावेळी एक मोठी दुर्घटना घडली. त्याचवेळी खांब्याजवळून दोन सख्खी भावंडं रस्त्याने जात होती. त्यांच्या अंगावर 11 हजार व्होल्टेजची विजेची तार पडली.
मुलांच्या अंगावर विजेची वायर कोसळल्यानंतर आग देखील लागली. तसेच विजेचा झटका आणि आगीमुळे दोन्ही मुलांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. दोन्ही मुलं या घटनेत भाजले होते. विशेष म्हणजे या मुलांच्या पाठीमागे आणखी एक व्यक्ती होता. तो देखील त्यांच्यामागे पळत होता. पण सुदैवाने तो बचावला.
पोलीस घटनास्थळी दाखल
संबंधित घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलांच्या कुटुंबियांना या घटनेची महिती देण्यात आली. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळवली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मुलांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलं. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का याचा तपास केला. अखेर पोलिसांना घटनेचं जसंच्या तसं दृश्य दिसेल असं सीसीटीव्ही फुटेज मिळालं.
पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलीस या प्रकरणी नेमका दोषी कोण याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार नोंद केली आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत. या दरम्यान काही स्थानिकांनी ट्रक चालकावर कारवाई करण्याची मागणी केली. तर काहींनी अशाप्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून अशा वायरी अंडरग्राऊण्ड किंवा इतर काहीतरी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा
‘न्यूज 18 हिंदी’ या वृत्तसंस्थेने याबाबतचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केलाय. तो पुढीलप्रमाणे :
हेही वाचा :
VIDEO : अंगातलं भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला अमानुष मारहाण, अखेर भोंदू बाबावर गुन्हा दाखल
VIDEO : विवस्त्र होऊन दगडफेक, गाड्या अडवल्या, रुग्णवाहिकेचा ताबा घेतला, पुण्यात माथेफिरुचा धिंगाणा
‘आयुष्याशी खूप त्रस्त झालोय’, पत्नीला संपवत तरुणाची आत्महत्या, अवघ्या 11 दिवसांचं बाळ पोरकं