वैतरणा नदीच्या काठावर सेल्फी घेत होत्या, तोल गेला अन्…

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, विरार, मांडवी पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने तात्काळ शोधकार्य सुरु केले.

वैतरणा नदीच्या काठावर सेल्फी घेत होत्या, तोल गेला अन्...
वैतरणा नदीत दोघी बुडाल्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 9:24 PM

विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार : फोटो काढण्याच्या नादात तोल जाऊन वैतरणा नदीत दोन मुली बुडाल्याची (Two Girls Drowned in Vaitarana River) घटना आज घडली आहे. वैतरणा फणसपाडा जेट्टीवर (Vaitarana Phanaswada Jetty) आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. एकीचा मृतदेह सापडला असून दुसरी अद्याप बेपत्ता (Missing) आहे. विरार पोलीस आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून रात्रीही शोधकार्य सुरूच आहे.

चार मैत्रिणी जेट्टीवर फिरायला गेल्या होत्या

चार मैत्रिणींचा ग्रुप शनिवारी वैतरणा फणसवाडा जेट्टीवर फिरायला गेला होता. जेट्टीवर फोटो, सेल्फी फोटो काढत असताना एकीचा तोल गेला. तिला वाचविण्यासाठी सोबतच्या तीन जणी गेल्या. यात दोघी बुडाल्या तर दोघी सुखरूप बाहेर निघाल्या आहेत.

एकीचा मृतदेह सापडला, दुसरीचा शोध सुरु

मृतांपैकी एक अल्पवयीन मुलगी आहे. लीला दस आना असे बुडालेल्या 24 वर्षीय मुलीचे नाव आहे. तर 15 वर्षाची अन्य मुलगीही बुडाली आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह मिळाला असून लीलाचे शोधकार्य सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, विरार, मांडवी पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने तात्काळ शोधकार्य सुरु केले.

अंधारामुळे शोधकार्यात अडचणी

यावेळी एका मुलीचा मृतदेह मिळाला पण एक मुलगी बेपत्ताच आहे. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता मुलीचा शोध घेणे सुरूच आहे. मात्र रात्रीच्या अंधारात शोध घेण्यास अडथळा निर्माण होत असल्याने तिचा शोध लागला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.