Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस सिलिंडर स्फोटातील दोघांचा नाशिकमध्ये मृत्यू; चार कामगारांवर उपचार सुरू

नाशिकमधल्या कुमावतनगरमध्ये झालेल्या भीषण गॅस सिलिंडर स्फोटातील 6 जखमी कामगारांपैकी दोघांचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. यातल्या चार जणांवर उपचार सुरू आहेत.

गॅस सिलिंडर स्फोटातील दोघांचा नाशिकमध्ये मृत्यू; चार कामगारांवर उपचार सुरू
नाशिकच्या गॅस सिलिंडर स्फोटातील दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 11:11 AM

नाशिकः नाशिकमधल्या कुमावतनगरमध्ये झालेल्या भीषण गॅस सिलिंडर स्फोटातील 6 जखमी कामगारांपैकी दोघांचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. यातल्या चार जणांवर उपचार सुरू आहेत.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, कुमावतरनगरमध्ये सहा कामगार एकत्र रहायचे. ते परराज्यातील असून टाइल्स बसवण्याचे काम करतात. शुक्रवारी सकाळी त्यांना कामावर जायची घाई होती. सकाळचा स्वयंपाक करायला गॅस सुरू करण्यासाठी त्यांच्यातील एकाने काडीपेटीची काडी पेटवली. तेव्हा गॅस सिलिंडरचा भडका उडून मोठा स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. यामध्ये लवलेश धरम पाल (रा. अदालतपूर, उत्तर प्रदेश), अखिलेख धरमपाल, विजयपाल फत्तेपूर, संजय मौर्य, अरविंद पाल, वीरेंद्रकुमार (सर्व रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत. यातले दोघे मजूर नव्वद टक्के भाजले असल्याचे समजते. या दोघांचा मृत्यू झाला असून, इतर चार जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, गॅस गळतीमुळे 6 महिन्यांत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलमध्ये सारडा सर्कल येथील संजरीनगर सोसायटीत गॅस सिलिंडर बदलताना गळती झाली. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील भारतनगर झोपडपट्टीमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन पाच युवकांचा बळी गेला होता. तर चार सप्टेंबर रोजी एका हॉटेलमध्ये गॅस स्फोट झाल्याची घटना घडली होती. यात स्वयंपाकी रूपेश गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, नागरिकांनी दक्षता घेतली आणि काही नियम पाळले तर गॅस सिलिंडर गळतीचे अपघात रोखले जाऊ शकतात. त्यासाठी फक्त थोडी दक्षता घ्यावी लागेल.

गॅस गळती होऊ नये म्हणून ही दक्षता घ्या

– गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर रात्री झोपण्यापूर्वी बंद करावे. – रेग्युलेटरला अडकावलेले पांढरे झाकण रात्री सिलिंडरला लावावे. – गॅसचा थोडाही वास आल्यास घराचे दरावाजे, खिडक्या तात्काळ उघडा. – काडीपेटी, लायटर पेटवू नका. पंखे, बल्बही सुरू करू नका. – गॅसचा वास जाईपर्यंत काळजी घ्या. – गॅस गळती झाल्यास सिलिंडर घराबाहेर अथवा मोकळ्या जागेत न्यावे. – घरात गॅसने पेट घेतल्यास चादर पाण्यात बुडवून ती सिलिंडर भोवती गुंडाळा.

इतर बातम्याः

गब्बर कांदा व्यापाऱ्यांचे कारनामेः 100 कोटींचा ब्लॅकमनी जमीन खरेदीत, नाशिकमधले 26 जण रडारवर

‘मविआ’च्या शिल्पाची काळजी घ्यावी, मी सेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा षटकार, नांदगावबद्दल पवारांशी बोलणार

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.