Gang Rape | कुटुंबीयांना अनैतिक संबंधांविषयी सांगण्याची धमकी, विवाहितेवर दोघांचा सामूहिक बलात्कार
पीडित महिला बांधकाम मजूर आहे. एका सहकाऱ्यासोबत तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला जातो. 13 डिसेंबरला पीडिता प्रियकराला भेटण्यासाठी घरातून निघाली होती. त्यावेळी दोघा जणांनी तिला अडवलं.
हैदराबाद : कुटुंबीयांना तुझ्या अनैतिक संबंधांविषयी माहिती देऊ, अशी धमकी देत विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 13 डिसेंबरला हा प्रकरार घडल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी पीडित महिला आणि तिच्या प्रियकराने कीटकनाशकं पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने दोघंही जण बचावले आहेत.
काय आहे प्रकरण?
महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. पीडित महिला बांधकाम मजूर आहे. एका सहकाऱ्यासोबत तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला जातो. 13 डिसेंबरला पीडिता प्रियकराला भेटण्यासाठी घरातून निघाली होती. त्यावेळी दोघा जणांनी तिला अडवलं.
रिकाम्या खोलीत नेऊन गँगरेप
कुटुंबीयांना तुझ्या अनैतिक संबंधांविषयी माहिती देऊ, अशी धमकी देत दोघांनी तिला एका रिकाम्या खोली नेले. तिथे दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पीडितेचा प्रियकरासह आत्महत्येचा प्रयत्न
14 डिसेंबरला पीडित विवाहिता आणि तिचा प्रियकर विकराबाद जिल्ह्यातील एका निर्जन ठिकाणी गेले. तिथे दोघांनी कीटकनाशकं प्राशन केली. शुद्ध हरपण्याआधी महिलेच्या प्रियकराने कुटुंबातील एका सदस्याला फोन केला आणि परिस्थिती सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी दोघांचा शोध घेतला आणि त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं.
शुद्धीवर आल्यानंतर पीडित महिलेने आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराविषयी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गँगरेपची तक्रार दाखल केली.
संबंधित बातम्या :
प्रियकराच्या मदतीने पतीच्या ‘माये’वर पत्नीचा डल्ला; ऐकावं ते नवलच…!
खाणीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आपली मुले खेळायला कुठे जातायत यावर लक्ष ठेवा…!
CCTV | ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं