AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीची पर्स चोरी केल्याच्या संशयातून दोन प्रवाशांचे अपहरण, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

आरोपी अझर शेख आताहूर रहमान हा आपल्या पत्नीसह जयनगर ते मुंबई पावन एक्सप्रेसने प्रवास करत होता. याच रेल्वे डब्यातून सज्जात शेख आणि सजीज शेख हे देखील प्रवास करत होते.

पत्नीची पर्स चोरी केल्याच्या संशयातून दोन प्रवाशांचे अपहरण, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ
पर्स चोरल्याच्या संशयातून सह प्रवाशांचे अपहरणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 1:25 PM

कल्याण / सुनील जाधव (प्रतिनिधी) : रेल्वेतून प्रवास करत असताना एका प्रवाशाने पत्नीची पर्स चोरल्याचा आरोप करत दोन सह प्रवाशांचे अपहरण करत त्यांना डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघा तरुणांना भिवंडी येथे दोन दिवस डांबून ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे पत्नीच्या पर्समधील पैसे आणि दस्तावेज मिळाले नाही म्हणून संतप्त पतीने 50 हजाराची खंडणी मागितली. या संदर्भात कल्याण जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. अझर आताहूर रहमान शेख असे या आरोपीचे नाव असून, कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहे. ही घटना उघड होताच परिसरात एखच खळबळ माजली आहे.

आरोपी आणि पीडित पावन एक्स्प्रेसने करत होते प्रवास

आरोपी अझर शेख आताहूर रहमान हा आपल्या पत्नीसह जयनगर ते मुंबई पावन एक्सप्रेसने प्रवास करत होता. याच रेल्वे डब्यातून सज्जात शेख आणि सजीज शेख हे देखील प्रवास करत होते.

आरोपीच्या पत्नीची पर्स चोरीला गेली

प्रवासादरम्यान रहमान याच्या पत्नीची पर्स गाडीतून चोरीस गेली होती. पर्समध्ये काही पैसे असल्याने सहप्रवासी असणाऱ्या सज्जात आणि सजीत शेख यांच्यावर अजर रहमान याने पर्स आणि पैसे चोरी केले असल्याचा संशय व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

पर्स चोरल्याच्या संशयातून सहप्रवाशांना डांबले

इतकेच नव्हे तर अझरने कल्याण स्थानकात दोघांना उतरवत या दोघांनाही थेट भिवंडी येथील एका घरात घेऊन गेला. दोघांना त्या घरात दोन दिवस डांबून ठेवले. मग त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या घरच्यांकडून 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.

नागपाडा पोलिसांनी केली तरुणांची सुटका

नातेवाईकांना अपहरणाची माहिती मिळताच त्यांनी मुंबई नागपाडा पोलीस ठाण्यात याबाबक गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तपास करत या दोघांची सुटका केली.

नागपाडा पोलिसांनी ही तक्रार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केली. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.