जावायाने असे काय केले…वाचवण्यास गेलेल्या मेहुण्याचा मृत्यू, सासरा गंभीर
Crime News: सुरेश भुले आत्महत्या करत असल्याची बाब त्यांच्या सासाऱ्यांना आणि मेहुण्यास समजली. त्यांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. परंतु त्यावेळी सुरेश भुले यांनी गॅसचे कॉक सुरु ठेवल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांचा मेहुणा ऋषिकेश चौधरी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर सासरे गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील वरुड शहरात भवानी चौकात ही घटना घडली आहे. वरुड शहरातील सुरेश भुले यांनी आज पहाटे आपल्या दुसऱ्या मजल्यावरील घरात फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गॅसचे कॉक सुरू केले होते.
सुरेश भुले आत्महत्या करत असल्याची बाब त्यांच्या सासाऱ्यांना आणि मेहुण्यास समजली. त्यांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. परंतु त्यावेळी सुरेश भुले यांनी गॅसचे कॉक सुरु ठेवल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांचा मेहुणा ऋषिकेश चौधरी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तसेच सुरेश भुले यांचे सासरे श्याम चौधरी हे गंभीर झाले आहे. त्यांना तातडीने नागपूर याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परिसरातील लोकांची धाव
घरगुती सिलेंडरचा कॉक सुरू करून श्याम चौधरी यांचे जावाई सुरेश भुले यांन फाशी घेऊन आत्महत्या केली. या प्रकारानंतर सिलेंडरचा स्फोट झाला. त्या आवाजाने परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत शेजारच्या घरांचे नुकसान झाले. नागरिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिघांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु सुरेश घुले आणि ऋषिकेश चौधरी यांचा मृत्यू झाला होता. श्याम चौधरी यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. श्याम चौधरी यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांचा जबाब घेण्यात येणार आहे. सुरेश भुले यांनी आत्महत्या का केली? याचे कारणही अजून समोर आले नाही. परंतु या प्रकारामुळे चौधरी आणि घुले परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.