मॉडेलिंगचं काम देतो सांगत फसवलं, आधी गेस्ट हाऊसला बोलावलं, नंतर जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे (two women raped in Lucknow on name of modeling).
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. जाहीरात चित्रपटात मॉडेलिंगचे काम देण्याच्या नावाने दोन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपीचं नाव हिमांशू सोनी असं आहे. याप्रकरणी पीडितांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे (two women raped in Lucknow on name of modeling).
आरोपीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला
आरोपी हिमांशू सोनी याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडितेशी संपर्क साधला. जाहिरातीत मॉडेलिंगचं काम देतो असं म्हणत त्याने पीडितेला गेस्ट हाऊसला बोलावलं. त्यानंतर त्याने पीडितेवर बलात्कार केला. पीडितीने आपल्या एका मैत्रिणीकडे आपलं दु:ख व्यक्त केलं. त्यावेळी तिच्या मैत्रिणीसोबतही अशाचप्रकारे आरोपीने बलात्कार केल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर दोघी पीडितांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली
पोलिसांनी तपास केला असता आरोपी हा राजाजीपुरमचा रहिवासी असल्याचं उघड झालं आहे. तो जाहिरात चित्रपटात शूटिंगचं काम करतो. त्याने इन्स्टाग्रामवर लखनऊमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मुलीसोबत संपर्क साधला. त्याने तिला एका नामांकित कंपनीत ऑडिशनसाठी देण्यासाठी विराजखंड येथे बोलावलं. या दरम्यान त्याने पीडितेवर बलात्कार केला. याशिवाय पीडितेने विरोध केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
पीडित तरुणीने आपल्या एका मैत्रिणीला हा सर्व प्रकास सांगितला. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने आपल्यासोबतही हिमांशूने अशाप्रकारचं कृत्य केल्याचं सांगितलं. पण समाजाला घाबरुन, लोक काय म्हणतील या भीतीने पोलिसात तक्रार केली नाही, असं पीडितेने सांगितलं. त्यानंतर दोघी पीडितांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी हिमांशूचा शोध ते घेत आहेत (two women raped in Lucknow on name of modeling).
हेही वाचा : संतापजनक ! बलात्कार पीडितेची गावकऱ्यांनी आख्ख्या गावात धींड काढली