रेल्वे ट्रॅकवर बसणे दोन भावांना पडले अत्यंत महागात, हेडफोनने घेतला जीव, धक्कादायक घटना
नुकताच एक धक्कादायक घटना उघडकीस आलीये. रेल्वे ट्रॅकवर बसून गाणे ऐकणे दोन युवकांना चांगलेच महागात पडल्याचे दिसतंय. रेल्वेची धडक या युवकांना बसलीये. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातंय.
मुंबई : कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडलीये. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातंय. हेडफोनमुळे दोन भावांना आपला जीव गमवावा लागलाय. दोन चुलत भाऊ रेल्वे ट्रॅकवर हेडफोन घालून बसलेले असताना अचानक रेल्वे आली आणि या दोघांना थेट धडक दिली. यानंतर या दोघांचा जागीच जीव गेल्याची घटना घडलीये. धक्कादायक म्हणजे ही घटना दिवाळीच्या एक दिवस अगोदरच घडलीये. आर्मीच्या मेडिकल ट्रेनने या दोघांना धडक दिली.
हेडफोन कानात असल्याने या दोघांना ट्रेनचा आवाज न आल्याने ही घटना घडलीये. हे दोन्ही भाऊ अग्निवीरची तयारीत करत होते. हे दररोज सकाळी व्यायाम करण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळ जात असत. नेहमीप्रमाणे हे शनिवारी देखील गेले. मात्र, हेडफोन घालून रेल्वे ट्रॅकवर बसण्याची चूक यांना महागात पडलीये.
रेल्वेने चिरडल्याने यांचा जागीच जीव गेला. या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. हे युवक शाहपुर गाव येथील रहिवाशी होते. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रेल्वेच्या गॅंगमॅनने अत्यंत महत्वाची माहिती ही सांगितले आहे.
गॅंगमॅन म्हणाला की, समोरून रेल्वे येत होती आणि हे युवक रेल्वे ट्रॅकवर बसल्याचे मी बघितले. यावेळी मी या युवकांना आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, माझा आवाज हा त्यांच्यापर्यंत पोहचू शकला नाही. या दोन्ही युवकांच्या कानामध्ये हेडफोन होता. बहुतेक हे गाणे ऐकत असल्याने माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचू शकला नाही.
वेळ इतका कमी होता की, थेट समोरून ट्रेन आली आणि त्यांना धडक दिली. या युवकांना ज्या ट्रेनने धडक दिली ती ट्रेन आर्मीची मेडिकल ट्रेन होती. ही ट्रेन दोन डब्यांची होती. आता या प्रकरणामुळे गावात दु:खाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या अनेक घटना या घडल्या आहेत. नेहमीच सांगितले जाते की, रेल्वे ट्रॅकपासून दूर थांबला हवे. मात्र, वारंवार अशाप्रकारच्या घटना या घडताना दिसत आहेत.