नाशिकमध्ये दोन अपघातांमध्ये दोन तरुण ठार

नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. यातल्या पहिल्या घटनेत द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावर एका तरुणाला ट्रकने उडवले, तर दुसऱ्या घटनेत एमआयडीत दुचाकीवर पडून तरुणाचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये दोन अपघातांमध्ये दोन तरुण ठार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 3:57 PM

नाशिकः नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. यातल्या पहिल्या घटनेत द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावर एका तरुणाला ट्रकने उडवले, तर दुसऱ्या घटनेत एमआयडीत दुचाकीवर पडून तरुणाचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये अपघाताची पहिली घटना द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावर घडली. यात घटनेत एका ट्रकने धडक दिल्यामुळे 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत झालेला तरुण अविनाश राजेंद्र सूर्यवंशी हा जळगाव जिल्ह्यातल्या गलवाडा येथील होता. सध्या तो सिडकोतल्या दत्त चौकात रहायचा. याबाबत माहिती अशी की, अविनाश हा द्वारका सर्कलकडून दुचाकीवर (एम. एच. 15 डीजी 2239) उड्डाणपुलावरून सिडकोकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने (एम.पी. 09 एच.एच.8267) त्याच्या दुचाकीला उडवले. या घटनेत अविनाश जबर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार भिल हे करत आहेत. दुसऱ्या घटनेत दुचाकीवरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश कारभारी शिंदे (वय 30) असे मृताचे नाव आहे. ही घटना औद्योगिक वसाहतीत झाली. याबाबतची माहिती अशी की, महेश शिंदे हे एमआडीसीतून श्रमिकनगरकडे चालला होता. मात्र, अचानक धावत्या दुचाकीवरून ते रस्त्यावर पडले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे हे करत आहेत.

…अन् काळाने घातला घाला

देवदर्शन करून परतणाऱ्या महिलेचा महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये घडली. स्वाती शिंदे असे त्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नांदगावकरांनी रेल्वे प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मोर्चा काढला. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासोबत वीजेचे तांडव सुरूच आहे. वीज पडून शिरवाडे वणी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विभा महेश गुरव असे मृत महिलेचे नाव आहे. विभा गुरव या शेतात काम करत होत्या. यावेळी अचानक वीज कोसळल्याने विभा यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्र्यंबक तालुक्यातील चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

इतर बातम्याः

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’; पुनुमिया पिता-पुत्राच्या नावे खरेदी, नाशिक पोलिसांकडून तपास सुरू

अपार्टमेंटमध्ये नागोबा डोलाया लागला, हजार रुपयांसाठी ‘कोब्रा’ अडकावला दारावर; नाशिकमध्ये सर्पमित्राची नसती उठाठेव

पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.