नको तिथे रील्स बनवण्याची हौस महागात पडली, रील्स बनवताना किव्हा क्रॉसिंग करत होते अन् तितक्यात…

हल्ली सोशल मीडियाचे वेडापायी तरुण जीवघेणी स्टंट करताना दिसत आहेत. या स्टंटबाजीमुळे कधी कधी जीव गमवावा लागतो. मात्र तरीही नको तिथे रील्स बनवण्याचं वेड कमी होताना दिसत नाही.

नको तिथे रील्स बनवण्याची हौस महागात पडली, रील्स बनवताना किव्हा क्रॉसिंग करत होते अन् तितक्यात...
रील्स बनवताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 11:36 PM

सुनील जाधव, TV9 मराठी : हल्ली सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुणाई काय करेल याचा नेम नाही. त्यात रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करणे हा तर तरुणाईचा आवडता दिनक्रम. पण याच वेडापायी नको ते करायला जातात अन् जीव गमावून बसतात. अशीच एक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. रील्स बनवताना डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रेल्वे रुळांमध्ये मोबाईलवर रील्स बनवताना रेल्वेने उडवले. घटनेची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने आणि इतर रेल्वे टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवत, पोलीस पुढील तपास करत आहेत.

रेल्वे अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ

रेल्वे अपघातात मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात स्टंटबाजी करणे, रेल्वे ट्रॅक ओलांडताना आणि चालत्या गाडीतून चढताना किंवा उतरताना अनेक प्रवाशांना आपला जीव गमावावा लागत आहे. यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी आव्हान करून देखील प्रवासी ऐकत नसल्याने अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशाच प्रकारे सोमवारी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान डोंबिवली लोहमार्ग ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांना डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान दोन तरुणांना रेल्वेने धडक दिल्याची माहिती मिळाली.

रील्स बनवताना रेल्वेने धडक दिली

रील्स बनवताना क्रॉस करताना तरुणांना रेल्वेने धडक दिली. माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या धडकेत या दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी पंचनामा करत या दोन्ही तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार चेतन गोगावले आणि सुयोग उत्तेकर अशी दोघांची नावे आहेत. हे दोघेही डोंबिवली पूर्वेतील रहिवासी आहेत.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.