Harshvardhan Palande Attack : “त्याचा वचपा घेऊ नंतर….” उद्धव ठाकरेंनी कल्याणच्या हर्षवर्धन पालांडेंची केली विचारपूस

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विचारपूसची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सध्या शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचदरम्यान हल्ले सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Harshvardhan Palande Attack : त्याचा वचपा घेऊ नंतर.... उद्धव ठाकरेंनी कल्याणच्या हर्षवर्धन पालांडेंची केली विचारपूस
उद्धव ठाकरेंनी कल्याणच्या हर्षवर्धन पालांडेंची केली विचारपूसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 7:55 PM

कल्याण : महाराष्ट्रातील राजकारण रक्तरंजित होऊ लागला आहे. सत्तासंघर्षातून पेटलेल्या वादातून आता हल्ल्यांचे सत्र सुरु झाले आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला (Attack) करण्यात आल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही, तोच कल्याणमध्ये शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे (Harshvardhan Palande) यांच्यावर हल्लेखोरांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला आहे. आज सकाळी (बुधवारी) सकाळी ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्ल्यात जखमी झालेले पालांडे यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फोन कॉल करून विचारपूस केली. त्याचा वचपा घेऊ नंतर, त्याची काळजी करू नका. तुम्ही आधी एकदम व्यवस्थित व्हा, मी येईन तुम्हाला भेटायला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पालांडे यांनी धीर दिला आणि हल्ला घडवून आणणाऱ्या विरोधकांनीही टोला लगावला.

कल्याण शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले

कल्याणमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कल्याण शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालांडे यांनी हा हल्ला शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप केला आहे, तर गायकवाड यांनी मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. सध्या पालांडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज हर्षवर्धन पालांडे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पालांडे यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांना धीर दिला तसेच विरोधकांना टोला मारला. त्याचा वचपा घेऊ नंतर, त्याची काळजी करू नका. आधी स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित व्हा. मी येईन भेटायला, अशा शब्दांत उद्वव ठाकरे यांनी पालांडे यांना धीर दिला. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विचारपूसची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. सध्या शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचदरम्यान हल्ले सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हल्ल्यामागे शिंदे गटाचे महेश गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप

हर्षवर्धन पालांडे यांनी प्राणघातक हल्ल्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी त्यांच्यावरील या हल्ल्यामागे शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. ‘मी नेहमीप्रमाणे कामाला जात होतो. त्याचदरम्यान हल्लेखोरांनी माझी गाडी अडवली आणि शिवसेनेत पुढे पुढे करतो म्हणाले. नंतर मला दोन्ही बाजूंनी घेरण्यात आले आणि तलवार काढण्यात आली. त्यानंतर मला बाहेर ओढले. यावेळी मी निसटण्याचा प्रयत्न केला असता माझ्यावर वार करण्यात आले. यात माझ्या डोक्याला आणि कमरेवर गंभीर दुखापत झाली आहे, असे हर्षवर्धन पालांडे यांनी म्हटले आहे. (Uddhav Thackeray questioned Harshvardhan Palande over the phone regarding the attack)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.