भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या चालवल्या… दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या

घटनेनंतर तातडीने आकाश शर्मा आणि ऋषभ शर्मा यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगितले. जखमी झालेल्या कृष शर्मा याच्यावर उपचार सुरु आहेत. हा प्रकार आपआपसातील मतभेदाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या चालवल्या... दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
हल्लेखोर स्कुटीवरुन आले अन् हल्ला करुन प्रसार झाले.
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 10:38 AM

Crime News: दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. आपल्या घराच्या बाहेर दिवाळीचे फटाके फोडत असताना शर्मा कुटुंबियाबाबत ही घटना घडली. दिवाळीच्या दिवशी एकाच परिवारातील दोन दीपक विझल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. दिल्लीतील शाहदरा भागात ही घटना घडली. या घटनेत 40 वर्षीय आकाश शर्मा आणि 10 वर्षीय ऋषभ शर्मा यांचा मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

गुरुवारी रात्री ८.३० वाजता आकाश शर्मा आणि ऋषभ शर्मा घराच्या बाहेर फटके फोडत होते. त्यावेळी कृष दरवाज्यावर उभा राहून पाहत होता. त्यावेळी दोन जण स्कूटीवरुन आले. स्कूटीवर बसलेल्या व्यक्तीने खाली उतरत आकाश शर्मा यांना नमस्कार केला. त्यानंतर दुसरा व्यक्ती स्कूटीवरुन खाली उतरला. तो अचानक कमरेला लावलेली पिस्तूल काढतो आणि आकाश याच्यावर गोळी चालवतो. दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या कृष यालाही एक गोळी लागते. ऋषभ याला काही समजण्यापूर्वी हल्लेखोर स्कूटीवरुन पळून जाऊ लागले. ऋषभ त्यांचा मागे धावत होता. त्यावेळी त्याच्यावरही त्यांनी गोळी चालवली.

हल्ला करणारा अल्पवयीन

घटनेनंतर तातडीने आकाश शर्मा आणि ऋषभ शर्मा यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगितले. जखमी झालेल्या कृष शर्मा याच्यावर उपचार सुरु आहेत. हा प्रकार आपआपसातील मतभेदाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी पकडले आहे. या अल्पवयीन मुलाने आकाश यांना नमस्कार केला होता.

हे सुद्धा वाचा

घटनेबाबत योगेश शर्मा यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा मी पहिल्या मजल्यावर होतो. गोळीबार होताच धावत खाली आलो. भाऊ आकाश याला रक्तबंबाळ असलेले पाहिले. त्यानंतर थोड्या अंतरावर ऋषभ हा जखमी पडलेला दिसला. योगेश यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्या व्यक्तींना पैसे उधार दिले होते. ते पैसे परत मागितल्यावर त्यांनी धमक्या देणे सुरु केले.

Non Stop LIVE Update
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे.
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं.
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.