भुजबळ धमकीप्रकरणी दूध का दूध पानी का पानी होणार; आमदार कांदेंसह छोटा राजनच्या पुतण्याला समन्स
शिवसेना आमदार सुहास कांदे (ShivSena MLA) यांच्या भुजबळ धमकी प्रकरणाच्या आरोपानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
नाशिकः शिवसेना आमदार सुहास कांदे (ShivSena MLA) यांच्या भुजबळ धमकी प्रकरणाच्या आरोपानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस आता आमदार कांदे यांच्यासह अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Chhota Rajan) पुतण्या आणि रिपाइं आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना समन्स बजावणार असून, दोघांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत.
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे कांदे यांनी म्हटले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्रही दिले. मात्र, या प्रकरणाला एकदम कलाटणी मिळाली. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले. आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला होता. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही. मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही. त्यामुळे मी आमदारांचीच तक्रार करत त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला. शिवाय कांदे हे सारे लोकप्रियतेसाठी करून विनाकारण पोलिसांची दिशाभूल करत आहेत. याबाबत गृहमंत्री, पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गुरुवारी कांदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यातही पालकमंत्री छगन भुजबळ यांचा उल्लेख भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नव्हे प्राचार्य असल्याचा केला. याचे पुरावे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दिल्याचा दावाही त्यांनी केला. 12 कोटी निधी आला. यातील 10 कोटी रुपये भुजबळांनी कंत्राटदारांना वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त 2 कोटी दिल्याचे सांगितले.
म्हणे मुंबईच्या व्यापाऱ्याला आला फोन
भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. मग अधिकार नसताना छगन भुजबळ यांनी निधी वाटप करून गैरव्यवहार का करावा, असा सवाल कांदे यांनी केला. भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले, असा सवाल करत वर्मावर बोट ठेवले. गुन्हेगार कधी गुन्हा केला हे सांगत नाही. मुंबईच्या टेकचंदानी या व्यापाराला भुजबळांच्या बाजूने श्रीलंकेवरून धमकीचा फोन आला होता. भुजबळांची ही अशी पार्श्वभूमी आहे. अक्षय निकाळजे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा पोलीस आयुक्त तपास करतील, असे म्हटले होते.
तपासाला केली सुरुवात
कांदे-भुजबळ वादाने नाशिकमधले राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस कॉल रेकॉर्डिंग फुटेज तपासण असल्याचे समजते. त्यामुळे नक्की कांदे यांना कुणाचा फोन आला होता, कांदे खोटे बोलत आहेत की अक्षय निकाळचे या साऱ्याचे दूध का दूध आणि पानी का पानी होईल. (Underworld don Chhota Rajan’s nephew summoned along with Shiv Sena MLA Kande; Police will check the call recording footage)
इतर बातम्याः
VIDEO: कुणाला धमकी देत नाही, विनंती नक्की करतात, भुजबळांचं कांदे वादावर वक्तव्य
नाशिक येथे कृषी भवन उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा