लग्नाच्या हमीशिवाय भारतात अविवाहित मुली शरीरसंबंध ठेवत नाहीत : मध्य प्रदेश हायकोर्ट

कोर्टाच्या मते, भारतासारख्या रुढीप्रिय समाजात अविवाहित मुली लग्नाची निश्चिंती असल्याशिवाय केवळ मौजमजेसाठी मुलांसोबत शरीरसंबंध ठेवत नाहीत, असं न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर म्हणाले

लग्नाच्या हमीशिवाय भारतात अविवाहित मुली शरीरसंबंध ठेवत नाहीत : मध्य प्रदेश हायकोर्ट
कोर्ट
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 4:12 PM

भोपाळ : लग्नाची निश्चिती नसेल, तर भारतात अविवाहित मुली शारीरिक संबंध ठेवत नाहीत, असं वक्तव्य करत मध्य प्रदेश हायकोर्टाच्या इंदौर खंडपीठाने लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. भारत हा रुढीप्रिय समाज आहे, तो इतक्या प्रगत पातळीवर पोहोचलेला नाही, जिथे अविवाहित मुली केवळ मौजमजेसाठी मुलांसोबत शरीरसंबंध ठेवणं मान्य करतील, असं न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर म्हणाले.

काय आहे प्रकरण?

कोर्टाच्या मते, भारतासारख्या रुढीप्रिय समाजात अविवाहित मुली लग्नाची निश्चिंती असल्याशिवाय केवळ मौजमजेसाठी मुलांसोबत शरीरसंबंध ठेवत नाहीत, असं न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर म्हणाले. लग्नास नकार दिल्यामुळे पीडितेने दोन जूनला विषप्राशन केले होते. पोलिसांनी तिचा ‘अखेरचा जबाब’ नोंदवला, मात्र सुदैवाने ती बचावली. लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

आरोपीच्या वकिलांचा दावा काय

आरोपीविरोधात कलम 376 (बलात्कार) आणि अन्य कलमांच्या अंतर्गत उज्जैन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. लग्नाच्या आमिषाने युवकाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र दोघांमध्ये अडीच वर्ष प्रेमसंबंध असून परस्पर संमतीने त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, मात्र धर्माच्या कारणास्तव मुलीच्या आई-वडिलांनीच या लग्नाला विरोध केला होता, असे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

कोर्टाचे तरुणावर ताशेरे

आरोपीने ऑक्टोबर 2018 पासून लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. त्यानंतर, त्याने लग्नासही नकार दिला. त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत असल्याचे समजल्यावर पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा दावा फिर्यादी तरुणीच्या वकिलांनी कोर्टात केला. त्यानंतर, न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. मुलाने कोणतेही कृत्य करताना जबाबदारीचे भान बाळगावे, कारण अशा प्रकरणात मुलींना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, याकडेही कोर्टाने लक्ष वेधले

संबंधित बातम्या :

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही, मुंबई सेशन कोर्टाचा निकाल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.