प्रेमात यांच्या त्याग नाहीच? लिव्ह इन रिलेशनशिपनंतर वेगळं झाल्यावर तरुणाकडून किळसवाणं कृत्य

प्रेयसी वेगळं राहू लागल्याने आरोपी अभिषेक नाराज झाला. तो सुरुवातीला तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करु लागला (UP angry youth hacked facebook ID of woman after breaking live in relationship).

प्रेमात यांच्या त्याग नाहीच? लिव्ह इन रिलेशनशिपनंतर वेगळं झाल्यावर तरुणाकडून किळसवाणं कृत्य
'तो' आणि 'ती' लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, मुलीने वेगळं होताच तरुणाकडून फेसबुक आयडी हॅक करुन किळसवाणं कृत्य
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 2:44 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझीपूर (Ghazipur) येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बऱ्याच दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live-in relationship) राहत होता. पण काही कारणास्तव त्याची गर्लफेंड्र त्याला सोडून दुसरीकडे एकट्यात राहू लागली. याच गोष्टीचा राग मनात धरुन तरुणाने किळसवाणं आणि संतापजनक कृत्य केलं. त्याने संबंधित मुलीचं फेसबुक आयडी हॅक करुन (Facebook id hack) अश्लील व्हिडीओ आणि फोटो शेअर केले. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. प्रेमात लोक एकमेकांसाठी जीव देतात, अनेकजण काही कारणास्तव फार मोठा त्यागही करतात. मात्र, प्रेमात प्रेयसीला बदनाम करण्यासाठी तरुणाने असं कृत्य केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे (UP angry youth hacked facebook ID of woman after breaking live in relationship).

नेमकं प्रकरण काय?

संबंधित तरुणी ही श्रावस्ती जिल्ह्याच्या भूतनाथ येथील गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते. इथेच तिची भेट आर्यनगरचा रहिवासी अभिषेक याच्यासोबत झाली. दोघांची भेट झाल्यानंतर त्यांची मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते कित्येक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. ते बऱ्याच दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र तरुणीच्या कुटुंबियांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिला प्रचंढ झापलं. कुटुंबियांनी दम दिल्यानंतर तरुणीने अभिषेकची साथ सोडली आणि ती वेगळी राहू लागली.

तरुणाकडून मुलीला त्रास

प्रेयसी वेगळं राहू लागल्याने आरोपी अभिषेक नाराज झाला. तो सुरुवातीला तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न करु लागला. नंतर तो तिला वारंवार फोन करुन त्रास देऊ लागला. अभिषेकच्या वारंवार येणाऱ्या फोनमुळे कंटाळलेल्या तरुणीने त्याचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला.

अभिषेककडून तरुणीचा फेसबुक आयडी हॅक

संबंधित तरुणी आपला फोन उचलत नाही म्हणून अभिषेक संतापला. त्याने संतापात किळसवाणं कृत्य केलं. त्याने तरुणीचं फेसबुक आयडी हॅक केलं. त्यानंतर त्याने तिच्या फेसबुक आयडीवरुन अश्लिल फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले.

सायबर सेलकडून तपास जारी

अभिषेकच्या या घाणेरड्या कृत्यानंतर तरुणीने गाझीपूर कोतवालीला जावून त्याच्याविरोधात आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. तरुणीने विविध कलमांतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा सायबर सेलच्या मदतीने तपास सुरु आहे, अशी प्रतिक्रिया कोतवालीचे पोलीस अधिकारी प्रशांतद मिश्र यांनी दिली.

हेही वाचा : चार वेळा बघण्याचा कार्यक्रम, साखरपुडाही झाला, नवरा म्हणतो नवरीच्या डोळ्यात दोष, वधूपक्षाने धू-धू धुतला

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.