भयावह! आयुष्य देण्याच्या नावाने मरण वाटणारा ‘डॉक्टर डेथ’, 200 जणांचा जीव घेतला?

इटावा येथील 46 वर्षीय नूरबानो यांना हृदय विकाराचा झटका आला होता. त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने त्यांना इटावाच्या सरकारी रुग्णालयात नेलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्यांना पेसमेकर बसवण्याचा सल्ला दिला होता. पण डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यानंतर हे पेसमेकर छातीच्या आत बसवलं नाही तर बाहेरच्या बाजूने चिपकावल्याची माहिती समोर आली.

भयावह! आयुष्य देण्याच्या नावाने मरण वाटणारा 'डॉक्टर डेथ', 200 जणांचा जीव घेतला?
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 5:54 PM

इटावा (उत्तर प्रदेश) | 16 नोव्हेंबर 2023 : डॉक्टरांना आपण देव मानतो. डॉक्टर आपल्याला सर्व आजारपणातून बाहेर काढतात, असं आपण मानतो. डॉक्टरांना आपण ‘देवमाणूस’ म्हणतो. अर्थात काही डॉक्टर हे स्वत:ला रुग्णसेवेत झोकूनही देतात. पण उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि डॉक्टर पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या डॉक्टरचं नाव समीर सर्राफ असल्याची माहिती समोर आली आहे. हा डॉक्टर हृदयविकाराचा धक्का आलेल्या रुग्णांच्या छातीत बनावट किंना हलक्या क्वालिटीचं पेसमेकर लावायचा. त्यामागे पैसे कमावणे हाच त्याचा हेतू होता. जास्त पैसे कमावण्याच्या मोहापाई त्याने अशा अनेक रुग्णांच्या जीवाशी खेळ केलाय.

विशेष म्हणजे आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार त्याने अशाप्रकारे उपचार करुन जवळपास 200 जणांचा जीव घेतला आहे. पेसमेकर हे एक मशीन आहे जे प्रत्यार्पण करुन हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी छातीच्या आतल्या भागात बसवलं जातं. पण डॉक्टरने बनावट पेसमेकर रुग्णांच्या हृदयाजवळ बसवले. त्यातून अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

46 वर्षीय नूरबानो यांना हृदय विकाराचा झटका

इटावा येथील 46 वर्षीय नूरबानो यांना हृदय विकाराचा झटका आला होता. त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने त्यांना इटावाच्या सरकारी रुग्णालयात नेलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्यांना पेसमेकर बसवण्याचा सल्ला दिला होता. पण डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यानंतर हे पेसमेकर छातीच्या आत बसवलं नाही तर बाहेरच्या बाजूने चिपकावलं. नूरबानो यांनी जवळपास अडीच महिने जीवनाशी संघर्ष केला. त्यानंतर नूरबानो यांचा मृत्यू झाला.

40 वर्षीय नजीमा यांचाही मृत्यू

इटावाच्याच 40 वर्षीय रहिवासी नजीमा यांनादेखील हृदयाशी संबंधित आजार झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सैफई मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यांच्या उपचारासाठी जवळपास 4 लाख खर्च केले. त्यांनादेखील पेसमेकर लावण्यात आलं. पण त्यांचादेखील मृत्यू झाला.

अशाप्रकारच्या अनेक घटना इटावामध्ये घडल्या आहेत. या घटनांमागील खरा सूत्रधार आता समोर आला आहे. पैशांच्या मोहापाई त्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. विशेष म्हणजे अशाप्रकारचे उपचार 600 पेक्षा जास्त रुग्णांवर करण्यात आले आहेत. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर अनेक रुग्णांचे नातेवाईक पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार करत आहेत. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, ते समोर येत आहे.

आरोपी डॉक्टरला अटक

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी समीर सर्राफला अटक केली आहे. हा सर्व प्रकार इटावाच्या सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये घडला आहे. खरंतर या प्रकरणाशी संबंधित तक्रारी 2017 पासून येत होत्या. पण या तक्रारींना दाबण्याचं काम केलं गेलं. पण या वर्षी या प्रकरणात ट्विस्ट आलं. कारण युनिव्हर्सिटीचे चीफ मेडिकल सुपरिंटेंडेंट डॉक्टर आदेश कुमारने डॉक्टर समीर सर्राफ विरोधात मेडिकलच्या साहित्यांच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर डॉक्टर सर्राफचे पाय प्रकरणात आणखी खोलात गेला. अखेर पोलिसांनी 7 नोव्हेंबरला या डॉक्टरला बेड्या ठोकल्या. सर्राफ ज्या उपचारासाठी 75 हजार ते 1 लाखाचा खर्च यायचा, तिथे रुग्णांच्या नातेवाईकांकडून 4 ते 5 लाख रुपये वसूल करायचा.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.