Bus Accident : 2 डबल डेकर बस आपसात भिडल्या! 8 प्रवासी जागीच ठार, पूर्वांचल एक्स्प्रेसवर भीषण अपघात
या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जातेय.
उत्तर प्रदेश : सोमवारी सकाळी दोन डबल डेकर बसमध्ये भीषण अपघात (UP Bus Accident) झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत आठ प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर डझनभर लोकं गंभीररीत्या जखमी झालेत. दोन डबलडेकर बस एकमेकांना (Private Bus accident) भिडल्यानं हा अपघात घडला. उत्तर प्रदेशच्या बारबंकीत झालेल्या या अपघातानंतर एकच खळबळ उडाली. सोमवारी पहाटे पूर्वांच एक्स्प्रेस वे (Purvanchal expressway) वर हा अंगावर काटा आणणारा अपघात झाला. बिहारहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या दोन डबल डेकर खासगी बस एकमेकांना धडकल्या. एका भरधाव बसने मागून दुसऱ्या बसला धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली. तसंच जखमींनाही तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचा चक्काचूर झाला आहे.
जखमींची प्रकृती चिंताजनक
अपघातातील गंभीर जखमींना सीएचसी हैदरगडहून लखनौ ट्रॉमा सेंटरला हलवण्यात आलं आहे. तर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बसला हायवेवरुन हलवण्यात आलं आहे. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जातेय. या अपघातामुळे हायवेवरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान, आता बस महामार्गीवरुन हटवण्यात आल्यामुळे वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, मृतांच्या नातलगांना या अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे. मृतांचे कुटुंबीयही बाराबंकीला जाण्यासाठी रवाना झाल्याचं सांगितलं जातंय.
पूर्वांचल एक्सप्रेस-वे पर सड़क दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत दुःखद है।
संबंधित अधिकारियों को राहत व बचाव कार्य तेजी से संचालित करने और घायलों के समुचित उपचार हेतु निर्देश दिए गए हैं।
प्रभु श्री राम दिवंगत आत्माओं को शांति तथा घायलों को शीघ्र स्वास्थ्य लाभ प्रदान करें।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) July 25, 2022
मृख्यमंत्र्यांनीही व्यक्त केलं दुःख
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसंच आरोग्य यंत्रणेसह बचाव यंत्रणा आणि पोलिसांनाही सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2020 या वर्षात उत्तर प्रदेशात एकूण 30,590 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. त्यात एकूण 5,735 जणांनी जीव गमावला आहे. यात कार अपघाताच्या 17,538 घटनांमध्ये एकूण 3190 जण ठार झाल्याचीही आकडेवारी समोर आली आहे.