गायीला वाचवताना डबल डेकर बस ट्रकवर धडकली, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, 13 प्रवाशांचा मृत्यू
आऊटर रिंगरोडच्या किसान मार्गावर गाय वाचवण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रकला डबल डेकर बसची धडक झाली. पोलिसांनी सर्व जखमींना बाहेर काढले आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले
लखनौ : लखनौला लागून असलेल्या बाराबंकीमध्ये डबल डेकर बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. महिला आणि मुलांसह दोन डझनहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात लखनौ जिल्ह्यातील देवा पोलीस स्टेशन परिसरातील बाबुरीया गावाजवळ आऊटर रिंग रोडवर झाला. वेगवान डबल डेकर बस दिल्लीहून बहराइचकडे जात होती.
ट्रक आणि बसचे तुकडे-तुकडे
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सर्वांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की ट्रक आणि बसचे तुकडे झाले, पण टक्कर कशी झाली? हा प्रश्न निर्माण होत आहे.
13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, आऊटर रिंगरोडच्या किसान मार्गावर गाय वाचवण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रकला डबल डेकर बसची धडक झाली. पोलिसांनी सर्व जखमींना बाहेर काढले आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले, तेथून सुमारे पाच ते सहा गंभीर जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. या अपघातावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दु:ख व्यक्त केले.
योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात प्रवाशांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. यासह, मुख्यमंत्र्यांनी या अपघातातील जखमींना योग्य उपचार देण्याचे आणि बाधित लोकांना शक्य ती सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. एवढेच नाही तर त्यांनी मदतीच्या रकमेची घोषणाही केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले. जखमींना 50-50 हजारांची भरपाई दिली जाईल.
9 people killed, 27 injured in collision between a truck and a passenger bus in Barabanki. The injured have been shifted to Trauma Centre, says DM Barabanki. pic.twitter.com/WqaMlPyBEv
— ANI UP (@ANINewsUP) October 7, 2021
संबंधित बातम्या :