भयानक, साजिदने घरात घुसून दोन लहान मुलांना कुहाऱ्डीने कापलं, काही वेळात आरोपीच एन्काऊंटर

संधी साधून साजिद घरात घुसला. त्याने कुऱ्हाडीचे घाव घालून दोन सख्ख्या भावांची हत्या केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने तिसऱ्या मुलावर सुद्धा हल्ला केला होता. पण तो गंभीर जखमी झाला. गुन्हा केल्यानंतर साजिद तिथून पळाला.

भयानक, साजिदने घरात घुसून दोन लहान मुलांना कुहाऱ्डीने कापलं, काही वेळात आरोपीच एन्काऊंटर
Badaun murder case
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 9:03 AM

लखनऊ : दोन सख्ख्या भावांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. साजिदने घरात घुसून कुऱ्हाडीचे घाव घालून दोन लहान मुलांना संपवलं. अन्य एका मुलावरही त्याने हल्ला केला. हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी साजिद घरातून पळाला. तो नाक्यावर पोहोचला होता, तिथेच पोलिसांनी त्याच एन्काऊंटर केलं. उत्तर प्रदेशच्या बदायू शहरात ही घटना घडली. यामुळे बदायूमध्ये मोठा तणाव आहे. काही ठिकाणी तोडफोड, आगी लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तणाव पाहून अनेक ठिकाणी पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे.

सिविल लाइन क्षेत्राच्या बाबा कॉलनीमध्ये हत्येची ही घटना घडली. या कॉलनीमध्ये साजिद नावाचा एक युवक सलून शॉप चालवायचा. कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका माणसाचा सोमवारी साजिद बरोबर वाद झाला होता. तेव्हापासून साजिदच्या मनात राग धुमसत होता. ज्याच्या बरोबर वाद झालेला, तो व्यक्ती मंगळवारी संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर गेला होता. पत्नी ब्युटी पार्लरमध्ये होती. तीन मुल घरात होती.

घरातल दृश्य पाहून सगळेच स्तब्ध

संधी साधून साजिद घरात घुसला. त्याने कुऱ्हाडीचे घाव घालून दोन सख्ख्या भावांची हत्या केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने तिसऱ्या मुलावर सुद्धा हल्ला केला होता. पण तो गंभीर जखमी झाला. गुन्हा केल्यानंतर साजिद तिथून पळाला. कॉलनीच्या लोकांनी पाहिलं, तेव्हा त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. कॉलनीच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. ते घराच्या आता गेले. तिथल दृश्य पाहून स्तब्ध झाले. दोन भावाचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्या पडलेले होते. संपूर्ण खोलीत रक्त होतं. गंभीर जखमी अवस्थेतील मुलाला रुग्णालयात दाखल केलं. मुलांची आई घरी पोहोचली, तेव्हा समोरच दृश्य पाहून तिने हंबरडाच फोडला. हे सर्व पाहून तिथे जमा झालेल्या लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला.

नाक्यावर मृतदेह ठेवून ट्रॅफिक जॅम

लोकांनी सर्वप्रथम साजिदच सलून पेटवून दिलं. त्यानंतर नाक्यावर मृतदेह ठेवून ट्रॅफिक जॅम केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, ते लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. DM-SSP म्हणणही लोक ऐकत नव्हते. ही बातमी संपूर्ण शहरात पसरताच तणाव निर्माण झाला. काहीवेळाने आरोपी साजिद पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याची बातमी आली. त्यानंतर नातेवाईकांनी मुलाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. घरापासून काही अंतरावरच साजिदला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये संपवलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.