18 वर्षात पत्नी 25 वेळा पळाल्याच्या प्रकरणात सत्य आलं समोर, नवऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा
18 वर्षाच्या वैवाहिक जीवनात पत्नी 25 वेळा घरसोडून निघून गेली. प्रत्येकवेळी तिने पोलिसात खोटी तक्रार दाखल केली. अफसरच्या मते तिने त्याचं आयुष्य उद्धवस्त केलय. अफसरच 2006 साली रुबी खान बरोबर लग्न झालं होतं.
मागच्या आठवड्यात एक बातमी आली होती, 18 वर्षात 25 वेळा पत्नी घर सोडून पळाली म्हणून. सोशल मीडियावर या प्रकरणाची खूप चर्चा झालेली. बरेलीच्या अफसर अलीने पोलिसांसमोर आपलं दु:ख सांगितलं होतं. आता अफसरची पत्नी रुबी मीडियाशी बोलली, त्यावेळी तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. नवऱ्याची सगळी पोलखोल केली आहे. अफसरचे सर्व आरोपी चुकीचे असल्याचा दावा रुबीने केलाय. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील हे प्रकरण आहे. 18 वर्षात 25 वेळा पत्नी घर सोडून पळाल्याच्या प्रकरणात आता एक नवीन टि्वस्ट आलाय. पत्नी रुबी खानने पती अफसर अलीवर गंभीर आरोप केले आहेत. नवऱ्याला मला शरीरविक्रीय करायला लावायचा होता. पण मी नकार दिला, तेव्हा त्याने मला मारहाण केली. इतकच नाही, तो मला माझ्या मुलांना भेटू देत नव्हता असा आरोप रुबीने केलाय.
रुबीने सांगितलं की, “नवऱ्याच्या याच त्रासाला कंटाळून 18 वर्षात मी 25 पेक्षा जास्त खोल्या बदलल्या. मी जिथे कुठे भाड्याच्या घरात रहायची, तिथे नवरा येऊन तमाशे करायचा. जीवे मारण्याची धमकी द्यायचा. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून घर मालक मला घराबाहेर काढायचे” रुबी खाननुसार अफसर अलीने मीडियासमोर ड्रामा केला. त्याच्यावर जो खटला टाकण्यात आलाय, त्यातून बचावासाठी त्याने हे सर्व केलं. रुबीने अफसर विरोधात मारहाणीची तक्रार केलीय.
म्हणून सतत मला घर बदलावं लागलं
“मी नवऱ्यापासून वेगळी होऊन आता नोएडा येथील एका प्रायवेट कंपनीत नोकरी करते. पण आता मी नोकरीसोडून बरेलीला यावं, यासाठी तो माझ्यावर दबाव टाकतोय. तो जे सांगतो, ते मी केलं पाहिजे” असं रुबी खानने सांगितलं. पती जे कुठले आरोप करतोय, ते खोट, तथ्यहीन असल्याचा दावा तिने मीडियासमोर केला. “मी कधीही घरातून 25 वेळा पळाली नाही. नवरासारखा त्रास द्यायचा म्हणून सतत मला घर बदलावं लागलं. माझा नवीन पत्ता नवऱ्याला कुठून ना कुठून मिळायचा” असं तिने सांगितलं. एसएसपीला भेटून रुबी खानने आता न्यायाची मागणी केली आहे.