दोन मुस्लिम महिलांना जबरदस्तीने होळीचा रंग लावला, पाणी फेकलं, पोलीस काय Action घेणार?

काहीवेळाने मोटरसायकल पुढे निघून गेली. तिथून निघताना सुद्धा पाणी आणि रंग फेकण्यात आले. रंग लावल्यानंतर युवकांनी हर-हर महादेवच्या घोषणा दिल्या.

दोन मुस्लिम महिलांना जबरदस्तीने होळीचा रंग लावला, पाणी फेकलं, पोलीस काय Action घेणार?
two muslim women were forcibly applied holi colors
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 2:03 PM

दोन मुस्लिम महिलांना जबरदस्तीने होळीचा रंग लावण्यात आल्याच प्रकरण समोर आलय. सोशल मीडियावर या संबंधीचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालय. जबरदस्तीने रंग लावणाऱ्या समाजकंटकांविरोधात कारवाई करणार असल्याच पोलिसांनी म्हटलं आहे. धामपूर महाराज मंदिराजवळ ही घटना घडलीय. दोन मुस्लिम महिला बाईकवर मागे बसलेल्या. आपल्या परिचित व्यक्तीसोबत त्या घरी जात होत्या. त्यावेळी बाजारात काही लोक होळी खेळत होते. हे लोक मुस्लिम महिलांना रंग लावण्यासाठी त्यांच्याजवळ गेले. त्यावेळी महिलांनी त्यांना कलर लावण्यापासून मनाई केली. पण, तरीही त्यांना जबरदस्तीने रंग लावला. उत्तर प्रदेश बिजनौरच हे प्रकरण आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती बाइकवर बसलाय. दोन मुस्लिम महिला त्याच्या मागे बसल्या होत्या. त्याचवेळी काही लोकांनी त्यांच्या अंगावर पाणी फेकलं. जोरजोरात हॅप्पी होली म्हणून ओरडू लागले. महिलांनी त्यांना सांगितलं की, आम्ही बाजारात जातोय. आम्हाला रंग लावू नका. पण एका माणसाने बाइकवर बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याला रंग लावला. दुसऱ्याने बाइकवर मागे बसलेल्या महिलेला रंग लावला.

हर-हर महादेवच्या घोषणा

व्हायरल व्हिडिओमध्ये युवकाला बोलताना तुम्ही ऐकू शकता, हा मेन बाजार आहे. इथे मागच्या 70 वर्षांपासून होळी खेळली जातेय. तुम्ही इथे यायला नको होतं. काहीवेळाने मोटरसायकल पुढे निघून गेली. तिथून निघताना सुद्धा पाणी आणि रंग फेकण्यात आले. रंग लावल्यानंतर युवकांनी हर-हर महादेवच्या घोषणा दिल्या.

एसपी काय म्हणाले?

बिजनौरचे एसपी नीरज कुमार जादौन म्हणालेक की, “आम्हाला व्हिडिओबद्दल समजलय. आम्ही यावर कारवाई करु. अशा प्रकारे कोणाला त्रास देण चुकीच आहे. जबरदस्ती कलर लावणाऱ्यांविरोधात कारवाई होईल. लोकांनी होळी खेळावी, पण शांततेने. अशा प्रकारच वर्तन सहन केलं जाणार नाही”

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.