Shikhar Paan Masala | नोटा मोजताना आयकर विभागाचे हात दुखले, मशीन मागवली, घरात 150 कोटींचे घबाड?

शिखर पान मसालाचे मालक पियुष जैन यांच्या कानपूर येथील आनंदपुरी या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस आधी शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली होती

Shikhar Paan Masala | नोटा मोजताना आयकर विभागाचे हात दुखले, मशीन मागवली, घरात 150 कोटींचे घबाड?
पियुष जैनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 3:12 PM

लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयकर विभागाकडून जवळपास रोजच छापेमारी सुरु आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या एका पथकाने कानपूरमधील कन्नौज येथील पियुष जैन या परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर नुकताच छापा टाकला. यावेळी व्यापाऱ्याच्या घरात पैशांचे घबाड सापडले आहे. या नोटा इतक्या होत्या, की त्या मोजण्यासाठी मशीन मागवण्याची वेळ आली होती. शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाण्यांवर सुरु असलेल्या छापेमारीत जवळपास 150 कोटी रुपये किमतीच्या नोटा सापडल्याचं बोललं जातं.

काय आहे प्रकरण?

शिखर पान मसालाचे मालक पियुष जैन यांच्या कानपूर येथील आनंदपुरी या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस आधी शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली होती. पियुष जैन यांचा परफ्यूमचा व्यवसाय कन्नौजमधून चालतो. कारवाईदरम्यान आयकर विभागाची टीम नोटा मोजण्याचे मशीन घेऊन त्यांच्या घरी पोहोचली.

नोटा मोजण्याचे मशीन

आधी आयकर विभागाच्या पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर पथकाला घटनास्थळी नोटा मोजण्याची मशीन मागवावी लागली. त्यामुळे घराबाहेरील पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या

 ड्रेनेजमध्ये सहकारी पडला, एकामागून एक सहा जण वाचवायला गेले, चौघांवर काळाचा घाला

VIDEO | भर चौकात गोळीबार, पुण्यात तरुणाची हत्या, जुन्या वादातून काटा काढला?

चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, भावांकडून 32 वर्षीय प्रियकराची हत्या

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.