शारीरिक संबंधांना नकार, तरुणीची जंगलात हत्या, प्रियकराच्या मित्राने 24 वेळा चाकू खुपसला
लखनौमधील सरोजिनी नगर भागात पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिच्यावर चाकूचे 24 वार करण्यात आले होते

लखनौ : शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे प्रियकरानेच मित्रांच्या साथीने प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापलेल्या आरोपींनी तरुणीवर चाकूचे सपासप वार करण्यास सुरुवात केली. चाकू जेव्हा तरुणीच्या मणक्यात अडकला, तेव्हा कुठे आरोपींचं क्रौर्य थांबलं. तरुणीच्या प्रियकरासह तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये हा प्रकार घडला. (Uttar Pradesh Crime Boyfriend kills Girlfriend for Denying Physical Relationship)
लखनौमधील सरोजिनी नगर भागात पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिच्यावर चाकूचे 24 वार करण्यात आले होते. ही तरुणी सीतापूरची रहिवासी असल्याचं तपासात उघड झालं. पोलिसांनी तिचं घर गाठलं असता 12 जूनच्या संध्याकाळपासूनच आपली मुलगी बेपत्ता असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. तरुणी मोहम्मद कैफ नावाच्या संपर्कात असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं.
प्रियकराने जंगलात फिरायला नेलं
आरोपी मोहम्मद कैफ सरोजिनी नगर भागातील रहिवासी होता. गेल्या महिनाभरापासून युवतीची त्याच्याशी बातचित सुरु होती. आपले वडील घरी नाहीत, तर आईही गावाला गेली आहे, असं तिने 12 जूनला सहज आरोपी प्रियकराला सांगितलं. त्यानंतर त्याने तिला बाहेर फिरायला येण्यास बोलावलं.
मित्रांकडूनही शारीरिक संबंधास दबाव
आरोपी मोहम्मद कैफसोबत त्याचे मित्र आकाश आणि विशालही होते. आधी कैफ तिला घेऊन नवोदय विद्यालयासमोरील निर्जन जंगलात घेऊन गेला. त्यानंतर आकाश आणि विशालही त्यांच्या मागोमाग तिथे गेले. तिथे तिघांनी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव आणला. मात्र तिने स्पष्ट नकार देत आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
चाकूने एकामागून एक वार
आकाशने तरुणीचे हात पकडले, तर विशालने तिचे पाय पकडले. मात्र तरुणीचा आवाज वाढल्यामुळे विशालने खिशातून चाकू काढून तिच्या पाठीत खुपसला. तरुणीच्या कंबरेतून रक्त वाहू लागलं. तिघांशी झटापट करुन तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांनीही तिचा पाठलाग करुन पुन्हा पकडलं. आकाश आणि कैफ यांनी ओढणीने तिचा गळा आवळला. तर विशाल चाकूने एकामागून एक वार करत राहिला. अखेर मणक्यात अडकून चाकू तुटला. तरुणी गतप्राण झाल्यानंतर तिघा आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.
पोलिसांनी तरुणीच्या मोबाईल सीडीआरवरुन आरोपींची ओळख पटवली. त्यांची धरपकड केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तिच्यावर 6 इंच लांब चाकूने दोन डझनहून अधिक वेळा वार केल्याचं त्यांनी सांगितलं. अतिरक्तस्रावामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झालं.
संबंधित बातम्या :
बायको नसताना फेसबुक फ्रेण्डला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला
आधी खून नंतर जाळलं, युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने साताऱ्यात खळबळ
(Uttar Pradesh Crime Boyfriend kills Girlfriend for Denying Physical Relationship)