चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, भावांकडून 32 वर्षीय प्रियकराची हत्या

आरोपी आणि मयत तरुण हे दोघेही चुलत भाऊ आहेत. रामसिंगचे त्याच्या विधवा बहिणीशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, भावांकडून 32 वर्षीय प्रियकराची हत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 7:36 AM

लखनौ : उत्तर प्रदेशातील नोएडा पोलीस स्टेशन सेक्टर-39 परिसरातील हाजीपूरजवळ एका व्यक्तीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. विधवा चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे.

आरोपींच्या ताब्यातून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे. यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याच्या शोधात ठिकठिकाणी छापेमारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सेक्टर-39 पोलिसांना माहिती मिळाली की, हाजीपूर सोसायटीच्या गेट क्रमांक 2, सेक्टर-104 येथे एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. रामसिंग असे 32 वर्षीय मृताचे नाव असल्याचे तपासात समोर आले. तो शाहजहानपूर येथील जलालाबादचा रहिवासी होता. त्याचा भाऊ राजेश कुमार याने पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दोघांना अटक, तिसरा पसार

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले होते. पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून सुगावा लागला आणि जलालाबाद येथील मोहन याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही अटक केली आणि खुनात वापरलेला चाकूही जप्त केला. या हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा शोध सुरु आहे.

अनैतिक संबंधातून हत्या

अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, आरोपी आणि मयत तरुण हे दोघेही चुलत भाऊ आहेत. रामसिंगचे त्याच्या विधवा बहिणीशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

मोफत जेवण देलं नाही, मुंबईतील पोलीस निरीक्षकाची हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशात 24 तासांत दोन मुलींच्या हत्या, एकतर्फी प्रेमातून घडल्या घटना

पतीनेच दोन साथीदारांसोबत मिळून पत्नीवर केला गँगरेप; कोर्टाने ठोठावली ही शिक्षा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.