जेलमध्ये भेटलेल्या कैद्याच्या पोरीशी सूत, तिची मात्र दुसऱ्याशीच जवळीक, चिडलेल्या ‘आशिक’कडून डबल मर्डर

आकाशचा डोक्यात फावड्याने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह मिथुनने खड्ड्यात पुरला, तितक्यात गणेश तिथे पोहोचला. त्यामुळे त्याचीही हत्या करुन मिथुन आणि सत्यम यांनी दोन्ही मृतदेह खड्ड्यात पुरले.

जेलमध्ये भेटलेल्या कैद्याच्या पोरीशी सूत, तिची मात्र दुसऱ्याशीच जवळीक, चिडलेल्या 'आशिक'कडून डबल मर्डर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 8:57 AM

लखनौ : उत्तर प्रदेशातील दोन तरुणांच्या हत्या प्रकरणाचे गूढ (Uttar Pradesh Double Murder) उकलण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. गोरखपूरमधील झंगहातील नौवाबारी पलिपा गावात राहणाऱ्या आकाश आणि गणेश या तरुणांची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी देवरिया जिल्ह्यात राहणाऱ्या मिथुन आणि सत्यम या दोघा तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. आपल्या प्रेयसीशी जवळीक वाढवल्याच्या रागातून मिथुनने आकाशचा काटा काढला, तर हत्या करताना पाहिल्यामुळे त्याने आकाशचा मित्र गणेशचाही जीव घेतला. धक्कादायक म्हणजे, जो कोणी माझ्या प्रेयसीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल, त्याला मी जीवानिशी मारुन टाकेन, असा मिजास खुनाची कबुली देताना मिथुनचा होता. पोलिसांनी हत्या प्रकरणात वापरलेले फावडे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रामपूर कारखाना पोलीस स्टेशन हद्दीतील बंकाटा गावात राहणाऱ्या मिथुन कुमार याचे झांघा येथील नौवाबारी पलिपा गावात आजोळ आहे. तो तिथेच राहतो. मात्र 2020 मध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो तुरुंगात गेला होता. कारागृहातच त्याची ओळख एका कैद्याशी झाली, जो सुनेच्या हत्या प्रकरणात पत्नीसोबत तुरुंगात खडी फोडत होता. मिथुन आणि तो एकाच बराकीत होते, गप्पांमुळे दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. त्याची मुलगी तुरुंगात असलेल्या आई-वडिलांना भेटायला येत असे. यावेळी मिथुनचीही तिच्याशी मैत्री झाली. मिथुन सुमारे आठ महिने तुरुंगात होता.

मिथुन चांगला मुलगा आहे, तो तुला सर्व प्रकारे मदत करेल, असं तुरुंगात कैद पित्याने मुलीला सांगितलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मिथुनने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तीसुद्धा मिथुनसोबत त्याच्या आजोळी राहू लागली, त्यानंतर त्यांच्यातील जवळीक आणखी वाढली. मिथुनसोबत राहताना गावातील आकाश नावाच्या तरुणाशीही तिची ओळख झाली. सप्टेंबर 2021 पर्यंत ती मिथुनसोबत राहत होती, मात्र त्यानंतर तिने मिथुनला दूर केले. मिथुनला समजले की ती आकाशच्या जवळ गेली आहे. त्यामुळे मिथुनने थेट तिला लग्नासाठी विचारणा केली पण तिने नकार दिला.

आकाश एका दुकानात काम करायचा. तिथे त्याने 27 हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप होता. ही रक्कम भरण्यासाठी तो कामाच्या शोधात होता. 7 जानेवारीला तो गणेशसोबत कामासाठी निघाला, तीन दिवसांनी दोघेही घरी आले. 10 जानेवारीला मिथुनने त्याला सोबत नेले आणि चोरी करुन किंवा बनावट नोटा खपवून पैशांची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.

दारु पाजून काटा काढला

16 जानेवारीच्या रात्री आकाश आणि गणेशला मिथुनने भरपूर दारु पाजली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुनने मित्र सत्यमला फावडे आणि इतर वस्तू घेऊन तिथे बोलावले होते. आकाशचा डोक्यात फावड्याने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह मिथुनने खड्ड्यात पुरला, तितक्यात गणेश तिथे पोहोचला. त्यामुळे त्याचीही हत्या करुन मिथुन आणि सत्यम यांनी दोन्ही मृतदेह खड्ड्यात पुरले. हत्येनंतर मिथुन गावात आरामात राहू लागला, तर देवरिया जिल्ह्यातील गौरीबाजार भागातील हरमापूर येथे राहणारा त्याचा मित्र सत्यम आपल्या घरी गेला.

“वो सिर्फ मेरी है…”

ज्या मुलीमुळे मी दोघांची हत्या केली आहे, तिच्यावरही हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात यावा, अन्यथा बाहेर आल्यानंतर मी तिलाही ठार मारेन, असे मिथुनने पोलिसांना सांगितले. ती माझी आहे आणि बाहेर आल्यानंतरही माझीच राहील, कोणी तिच्या जवळ आले तर मी त्याला सोडणार नाही, असा इशाराही त्याने दिला.

मिथुन इतका चलाख आहे की बोटांचे ठसे सापडू नयेत, म्हणून त्याने हातमोजे घालून हे खून केले. पोलिसांना कोणताही पुरावा मिळू नये, म्हणून त्याने मोबाईल बंद होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आकाशचा मोबाईल त्याने जाळला आणि गणेशचा मोबाईल नदीत फेकून दिला.

संबंधित बातम्या :

तिसऱ्या नवऱ्याचा चारित्र्यावर संशय, एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी विवाहितेने दिरापासून झालेल्या मुलीला पेटवलं

पत्नी घरी न आल्यामुळे राग अनावर, सासूरवाडीत जाऊन थेट सासूची हत्या, अमरावतीत खळबळ

सासऱ्याचा खून करुन प्रियकरासोबत फरार, महिलेला सात दिवसांत बेड्या, हत्येचं नेमकं कारण काय ?

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.