बहिणीची तब्येत बिघडलेय, इमोशनल कारण देत ऑफलाईन OLA बूक, अर्ध्या वाटेत ड्रायव्हरला…

अटक केलेल्या आरोपींनी आपल्या बहिणीची तब्येत बिघडली असल्याचे सांगून ही कार वाराणसी कॅन्ट येथून ऑफलाइन बुक केली होती. यानंतर सय्यदपूरजवळ चालकाला धमकावून मारहाण करण्यात आली. त्याला गाडीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर आरोपींनी कारसह पळ काढला.

बहिणीची तब्येत बिघडलेय, इमोशनल कारण देत ऑफलाईन OLA बूक, अर्ध्या वाटेत ड्रायव्हरला...
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 11:39 AM

लखनौ : ओला कार बूक (OLA Car Book) करुन ड्रायव्हरला मारहाण करत गाडीची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. बहिणीची तब्येत बिघडल्याचं सांगून आरोपी ऑफलाईन ओला कार बूक करत असत. त्यानंतर अर्ध्या वाटेत ड्रायव्हरला धमकावून मारहाण करत. अखेर त्याला रस्त्यात उतरवून आरोपी गाडीसह पसार होत असत. उत्तर प्रदेशातील गाझीपूर भागात (Ghazipur Uttar Pradesh) ही टोळी जेरबंद करण्यात आली आहे. सैदपूर कोतवाली पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली आहे. आरोपींनी वाराणसी कॅन्ट येथून निघालेली ओला टॅक्सी लुटली होती. पोलिसांनी आरोपींकडून टॅक्सीसह बंदूक-काडतूस आणि मोबाईल जप्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक (एसपी) रामबदन सिंह यांनी दरोड्याच्या आरोपींना मीडियासमोर हजर केले. त्यांनी सांगितले की, शनिवारी वाराणसीच्या ज्ञानेंद्र पांडे यांनी तक्रार दिली होती. त्यांची सुझुकी डिझायर वाहन क्रमांक UP 65 KT 1217 ओलासाठी वापरली जात होती.

चालकाला धमकावून मारहाण

अटक केलेल्या आरोपींनी आपल्या बहिणीची तब्येत बिघडली असल्याचे सांगून ही कार वाराणसी कॅन्ट येथून ऑफलाइन बुक केली होती. यानंतर सय्यदपूरजवळ चालकाला धमकावून मारहाण करण्यात आली. त्याला गाडीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर आरोपींनी कारसह पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करुन आरोपींना पकडले.

गाझीपूरचे एसपी रामबदन सिंह यांनी सांगितले की, आरोपींपैकी दोघे सराईत दरोडेखोर असून त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तर दोघांची चौकशी सुरु आहे. त्यांच्या ताब्यातून लुटलेल्या ओला टॅक्सीसह एक पिस्तूल-काडतूस आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

घरापासून 100 मीटरवर अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न मृतदेह, ऊसाच्या शेतात दोन आरोपी सापडले

बाळाच्या किरकिरण्याचा वैताग, बापाने दोन वर्षांच्या लेकीला संपवलं, स्टोव्हवरुन पडून अपघाताचा बनाव

डॉ. हनुमंत धर्मकारे हत्याकांडातील मुख्य आरोपी अटक, दहा दिवसांची पोलीस कोठडी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.