जुळ्या भावांंचा एकत्रच अंत, 25 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, मध्यरात्री एक वाजता नेमकं काय घडलं?
गाझियाबादच्या विजयनगर पोलीस स्टेशन परिसरातील सिद्धार्थ विहारच्या एका सोसायटीमध्ये 25 व्या मजल्यावर एक कुटुंब राहते. 25 व्या मजल्यावर राहणाऱ्या या कुटुंबातील 14 वर्षीय सूर्य नारायण आणि सत्य नारायण, मध्यरात्रीनंतर फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये खेळत होते. खेळत असताना अचानक दोन्ही भाऊ बाल्कनीतून खाली पडले.
लखनौ : राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक अंगाचा थरकाप उडवणारा अपघात उघडकीस आला आहे. गाझियाबादच्या विजय नगर भागातील एका सोसायटीच्या 25 व्या मजल्यावरून पडून जुळ्या भावांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 16-17 ऑक्टोबरच्या रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या विजयनगर पोलीस स्टेशन परिसरातील सिद्धार्थ विहारच्या एका सोसायटीमध्ये 25 व्या मजल्यावर एक कुटुंब राहते. 25 व्या मजल्यावर राहणाऱ्या या कुटुंबातील 14 वर्षीय सूर्य नारायण आणि सत्य नारायण, मध्यरात्रीनंतर फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये खेळत होते. खेळत असताना अचानक दोन्ही भाऊ बाल्कनीतून खाली पडले.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी जुळ्या मुलांची आई घरात उपस्थित होती आणि दुसऱ्या खोलीत एक बहीणही होती, असे तपासात समोर आले आहे. वडील कामाच्या निमित्ताने मुंबईला गेले आहेत. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही जुळे भाऊ वेगवेगळ्या खोल्यांमध्ये होते. आई रात्री 12 वाजता झोपायला गेली होती. त्यानंतर काय झाले, दोन्ही भाऊ रेलिंग ओलांडून कसे पोहोचले आणि मग अपघात कसा झाला, हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या घटनेबाबत मृताच्या आईची चौकशी करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या आई आणि बहिणीचे जबाब पुन्हा घेतले जातील. मोबाईल फोनचाही शोध घेतला जात आहे. सध्या मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जुळे भाऊ नवव्या वर्गात शिकत होते. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
इतर बातम्या :
MNS | वाशी टोलनाक्यावर कर्मचाऱ्याला मनसेचा चोप, मराठीत न बोलल्याने कर्मचाऱ्याला मारहाण
अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप