पळून लग्न करायला जाताना बाईक अपघात, प्रेयसीचा जागीच मृत्यू, प्रियकर गंभीर

22 वर्षीय विद्यार्थिनीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र मुलाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता.

पळून लग्न करायला जाताना बाईक अपघात, प्रेयसीचा जागीच मृत्यू, प्रियकर गंभीर
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 1:43 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात प्रियकरासोबत बाईकने जात असलेल्या प्रेयसीचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात प्रियकरही जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघंही जण पळून जाऊन लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकरावर तरुणीची बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील जेहानाबाद शहरातील एका 22 वर्षीय विद्यार्थिनीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र मुलाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. शुक्रवारी सकाळी प्रियकराने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर कुटुंबीयांना सांगून तरुणी प्रियकरासह निघून गेली.

प्रेयसीचा जागीच अंत

पिलीभीत जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात बाईक झाडावर आदळून झालेल्या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत मोटारसायकल चालवणारा प्रियकरही गंभीर जखमी झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या नातेवाईकांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला.

बलात्कारानंतर हत्येचा आरोप

एवढेच नाही तर प्रेयसीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केला की, त्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. मात्र पोलिसांना हा अपघात असल्याचे दाखवून संपूर्ण प्रकरण दडपायचे असल्याचाही दावा केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक पवित्र मोहन त्रिपाठी यांनी सांगितले की, अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर तिच्या प्रियकरालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या मृतदेहाचे व्हिडीओग्राफी करून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याचवेळी गावातील लोकांचे म्हणणे आहे की मुलगा आणि मुलगी सकाळपासून घरातून बेपत्ता होते, दोघेही लग्न करणार होते, त्याच वेळी ही भीषण घटना घडली.

संबंधित बातम्या :

‘संसार रिक्षेची चाके थांबली, आत्महत्येशिवाय पर्याय नाही’, एकाच कुटुंबातील चौघांचे विषप्राशन

गुप्तधनाचे अमिष,10 लाख उकळले, पैसे परत मागितले तर म्हणे कोंबडा बनवतो, भोंदूला अटक!

बसची सिमेंट बल्करला धडक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार गाड्यांचा विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.