चौघा भावांचे केस कापण्यास न्हाव्याचा नकार, घरात घुसून भावंडांकडून निर्घृण हत्या

समीरला गुरुवारी बुलंदशहरमध्ये अटक करण्यात आली, तर अन्य तीन भाऊ फरार आहेत. चौघाही भावांवर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी समीरच्या परवानाधारक रायफलचा वापर करुन ही हत्या करण्यात आली.

चौघा भावांचे केस कापण्यास न्हाव्याचा नकार, घरात घुसून भावंडांकडून निर्घृण हत्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 9:41 AM

लखनौ : आधी उधारी चुकती करण्यास सांगत केस कापण्यास नकार दिल्याने न्हाव्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. 25 वर्षीय मोहम्मद समीरने इरफान अलीची गोळी झाडून हत्या केली. इरफानने समीर आणि त्याच्या तीन भावंडांचे केस कापण्यास नकार दिला होता. याच रागातून समीरने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील शरीफपूर भंसरोली गावात हा अंगावर काटे आणणारा प्रकार घडला.

समीरला गुरुवारी बुलंदशहरमध्ये अटक करण्यात आली, तर अन्य तीन भाऊ फरार आहेत. चौघाही भावांवर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी समीरच्या परवानाधारक रायफलचा वापर करुन ही हत्या करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला इरफानच्या घरातून बाहेर पळताना दिसते, तर तिच्या मागे मोठ्याने गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. शेजारी आरोपींना गोळीबार न करण्याची विनंती करतानाही व्हिडीओत दिसत आहेत. चार भावांपैकी दोघे भाऊ मुख्य गेटजवळ उभे राहून रायफलमधून गोळीबार करताना दिसतात, तर त्यावेळी दोघे गच्चीवर होते.

“या घटनेने अनेकांना जबर धक्का बसला आहे. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत त्याच गल्लीत राहणारे शेजारी घराबाहेर पडण्याचेच काय, तर साधे दार उघडण्याचेही धाडस करू शकले नाहीत” असे एका प्रत्यक्षदर्शीने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले.

नेमकं काय घडलं?

अगौटा पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) अमर सिंह यांनी सांगितले की, चार आरोपींनी आधी इरफानवर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर त्याचा चुलत भाऊ इम्रानवर गोळी झाडली, ती त्याच्या पायाला लागली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

“चौघेही भाऊ, मोहम्मद समीर, मोहम्मद साकीब, मोहम्मद शाहिद आणि आणखी एकावर खून आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे” असं पोलिसांनी सांगितलं. एफआयआरमध्ये चौथ्या भावाच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही आणि पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

उधारी चुकव, मग केस कापेन

बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) संतोष सिंग यांनी सांगितले की, इरफान आणि त्याचे कुटुंब केस कर्तनाचे दुकाने चालवत होते आणि होम सलून सेवा देखील देत होते. चौघा भावांनी इरफानला केस कापायला घरी बोलावले होते, पण त्याने नकार दिला आणि आधी त्यांची मागील उधारी चुकती करण्यास सांगितली. त्यानंतर रागाच्या भरात समीरने इरफान आणि त्याचा भाऊ इम्रानवर आपल्या रायफलने गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

ठाण्यात 3 वर्षाच्या लेकराचा आधी बलात्कार केला, नंतर खडकावर डोकं आपटून हत्या, आता हायकोर्टाकडून फाशीची शिक्षा

इंटर्न डॉक्टरवर बंदूक ताणणारा युवक पुण्यात गेला, पुन्हा नागपुरात सापडला, आत्महत्या करण्याच्या तयारीत?

महिलेसोबत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे, तलाठ्याने मित्रांनाही बोलावले, गावकऱ्यांनी दिला चोप

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.