लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आयुषमानची झोया, चारित्र्याच्या संशयातून बॉयफ्रेण्डकडूनच हत्या

फैजान सुमारे नऊ महिन्यांपासून आयुषमान उर्फ झोयासोबत पलटन कॅन्टोन्मेंटमधील एका घरात भाड्याने राहत होता. फैजानने 31 जानेवारीच्या रात्री आयुषमानची हत्या केली होती. हत्येनंतर तो कानपूरला पळून गेला होता.

लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आयुषमानची झोया, चारित्र्याच्या संशयातून बॉयफ्रेण्डकडूनच हत्या
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 7:40 AM

लखनौ : लिंगबदल शस्त्रक्रिया करुन आयुषमानची झोया झालेल्या ट्रान्सजेंडर तरुणीची हत्या (Transgender Woman Murder) करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तिचा प्रियकर फैजानला अटक केली आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. आरोपी फैजानने चौकशीदरम्यान सांगितले की, आयुषमान उर्फ ​​झोयासोबत तो राहत होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही काळापासून झोयाची दुसऱ्या तरुणासोबत जवळीक वाढली होती. त्यावरुन दोघांमध्ये भांडणं होत असत. घटनेच्या दिवशीही याच कारणावरुन खटके उडाल्यानंतर फैजानने झोयाच्या डोक्यात लोखंडी तवा डोक्यात घालून तिचा खून केला. हत्या केल्यानंतर तो पळून गेला, मात्र पोलिसांनी त्याला कानपूरमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

इन्स्पेक्टर मदियानव वीर सिंह यांनी सांगितले की, फैजान हा सआदतगंजचा रहिवासी आहे. सुमारे नऊ महिन्यांपासून तो आयुषमान उर्फ झोयासोबत पलटन कॅन्टोन्मेंटमधील एका घरात भाड्याने राहत होता. फैजानने 31 जानेवारीच्या रात्री आयुषमानची हत्या केली होती. हत्येनंतर तो कानपूरला पळून गेला होता. त्याला नारायणी पॅलेस हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.

फैजान अत्यंत चलाख आहे. झोयाचा मृत्यू आत्महत्या भासावी, यासाठी त्याने काचेच्या तुकड्याने तिच्या हाताची नस कापली होती. झोयाच्या दोन्ही हातांची नस कापण्यात आली होती.

मुलाच्या इच्छेपुढे वडीलही अगतीक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाजीपुरम येथील रहिवासी असलेल्या आयुषमानच्या वडिलांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलावर दिल्लीत लिंगबदल शस्त्रक्रिया झाली होती. मुलगा दहावीपर्यंत कॉन्व्हेंट शाळेत शिकला. नंतर तो तृतीयपंथीयांच्या संपर्काता आला. तो त्यांच्यासोबत राहू लागला. दोन वर्ष दिल्लीला राहून आल्यानंतर तो सेक्स चेंज ऑपरेशनसाठी वडिलांवर दबाव आणत होता.

विरोध केला तर मुलगा धमक्या द्यायचा. त्याने सांगितले की माझे शरीर आहे, माझ्या मनाला वाटेल ते मी करेन. त्याचा शरीरावर अधिकार आहे. त्याच्या इच्छेपुढे आमचे काही चालले नाही. मी त्याला 70 हजार रुपये दिले. त्यानंतर तो दिल्लीला गेले. तिथे गेल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि तो झोया म्हणून राहू लागला. यानंतर तो तृतीयपंथीयांसोबत राहून ढोलकी वाजवण्याचे काम करु लागला. त्याने घरी येणे-जाणेही बंद केले होते, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

11 वर्षांचे प्रेमसंबंध, मुंबईतील 28 वर्षीय तरुणीचा पालघरमध्ये खून, वयाने लहान बॉयफ्रेण्डला अटक

घरापासून 100 मीटरवर अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न मृतदेह, ऊसाच्या शेतात दोन आरोपी सापडले

बाळाच्या किरकिरण्याचा वैताग, बापाने दोन वर्षांच्या लेकीला संपवलं, स्टोव्हवरुन पडून अपघाताचा बनाव

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.