फराजसाठी धर्म बदलण्याची ट्यूशन, अनेकवेळा बलात्कार, गर्भपात अखेर अशी एक अट टाकली, की….
एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. निकाहच्यावेळी अशी एक अट टाकली की, सगळच संपलं. 14 नोव्हेंबरला वडिल मुलीच्या खोलीत गेले, तेव्हा समोरच दृश्य बघून त्यांना धक्का बसला. डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्यानंतर भाऊ कासिफच्या सांगण्यावरुन माझी एका कागदावर स्वाक्षरी घेतली.
एका मुलीने स्वत:ला पेटवून घेतलं. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुलासा केला आहे. पीडित युवतीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत आरोप केलाय की, “फराज अतरने माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. तिला धर्मांतर करायला लावून धोका दिला. या सगळ्याला त्रासून अखेर माझ्या मुलीने स्वत:चा आत्मदहन केलं” उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधील हे प्रकरण आहे.
पोलिसांनी युवक आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. कविनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील प्रकरण आहे. इथे राहणाऱ्या 70 वर्षाच्या वृद्धाने सांगितलं की, त्यांचा व्यवसाय होता. त्यातून 20 कोटीची संपत्ती कमावली. ती सगळी संपत्ती मुलीच्या नावावर होती. ही सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी फराजने आधी माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. स्वत: अविवाहित असल्याच सांगून तिला लग्नाच आश्वासन दिलं.
मुलीच्या खोलीत गेलो, तेव्हा मला धक्का बसला
त्यानंतर फराजने माझ्या मुलीच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केलं. फराजने स्वत:वर कर्ज असल्याच सांगून लाखो रुपये हडपले. पीडित वडिलांच्या सांगण्यानुसार, मागच्या काही महिन्यांपासून मुलीच वर्तन बदललं होतं. 14 नोव्हेंबरला मुलीच्या खोलीत गेलो, तेव्हा मला धक्का बसला. मुलगी दुसऱ्या धर्माच्या रितीरिवाजाच पालन करत होती. ते पाहून मला ब्रेन अटॅक आला. त्यामुळे मला दिल्लीच्या खासगी रुग्णालयात दाखल करावं लागलं.
फराजने मुलीची शपथ दिली
15 नोव्हेंबरला मी आयसीयूमध्ये असताना फराज मुलीसोबत मला पाहण्यासाठी आला. फराजने तिथे माझ्याकडे मुलीचा हात मागितला. नाईलाजास्तव मी परवानगी दिली. त्याने त्याचा भाऊ कासिफच्या सांगण्यावरुन माझी एका कागदावर स्वाक्षरी घेतली. त्यावर लिहिलं होतं की, मुलगी दुसऱ्या समाजाच्या मुलासोबत लग्न करतेय, त्यावर काही आक्षेप नाही. फराजने त्याचा भाऊ सुप्रीम कोर्टात वकिल असल्याच सांगितलं. फराजने मुलीची शपथ देऊन मी कुठे कोणाला सांगू नये अशी मला गळ घातली.
अनेकदा गर्भपात
फराजचा खरा चेहरा नंतर समोर आला. मुलीला सुद्धा कळलं फराज तिचा वापर करतोय. मुलीने वडिलांना सांगितलं की, “संपत्ती हडपण्यासाठी आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी फराज तिच्यासोबत राहीला. या दरम्यान अनेकदा तिचा गर्भपात केला. फराजने धर्म परिवर्तन करण्यासाठी तिची ट्यूशन लावली. दुसऱ्या धर्माची पुस्तक वाचण्यासाठी भाग पाडायचा”
काय अट ठेवली?
मुलीच्या वडिलांनी जे सांगितलय, त्यानुसार 24 नोव्हेंबरला फराजने मला आणि माझ्या मुलीला कौशांबी येथील हॉटेलमध्ये बोलावलं. तिथे त्याने भाऊ कासिफ, आई आणि बहिणीसोबत ओळख करुन दिली. फराजने हॉटेलचा सर्व खर्च आमच्याकडूनच घेतला. पाच डिसेंबरला मुलीने लग्नाची कागदपत्र तयार केली होती. 10 डिसेंबरला मुलीने सांगितलं की, “संपत्ती नावावर केल्यानंतरच लग्न करीन अशी फराजने अट ठेवली आहे” त्यामुळे त्रासलेल्या माझ्या मुलीने 11 डिसेंबरला चंद्रपुरी येथील घरात स्वत:ला पेटवून घेत जीवन संपवलं.