दुबई रिटर्न पतीने रात्री अशी कृती केली की, दुसऱ्यादिवशी बायकोने ट्रेनसमोर मारली उडी
आईला घराबाहेर पडताना मोठी मुलगी रिया गुप्ताने पाहिलं. ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण रिता ऐकली नाही. मुलगी तिच्यामागे जात होती. या दरम्यान खालिसरपूर येथे रीता रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसली.

उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. पतीसोबत वाद झाल्यानंतर एक महिलेने जीवन संपवलं. तिने थेट धावत्या ट्रेनसमोर उडी मारली. तिला वाचवायला मुलगी तिच्यामागे पळत गेली. तिचा सुद्धा ट्रेनची धडक बसून मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे मृतदेह सोशल मीडियावर व्हायरल केले. आई-मुलगी म्हणून दोघींची ओळख पटली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवले.
गाजीपूरच्या फरीद गावच हे प्रकरण आहे. या गावात राहणाऱ्या महिलेचा पतीसोबत जेवणावरुन वाद झाला. पतीने महिलेच्या दोन कानाखाली मारल्या. त्यानंतर पती रात्री झोपायला निघून गेला. पतीच मारणं महिलेच्या खूप जिव्हारी लागलं. सकाळ होताच ती उठली आणि घरातून बाहेर पडली. मागोमाग तिच्या मुलगी सुद्धा गेली. रस्ताभर मुलगी आईची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. पण महिला काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. महिलेने धावत्या ट्रेन समोर उडी मारली.
रमेश गुप्ता दुबईत नोकरी करायचा
गाजीपूर कोतवाली भागातील खालिसपुर गावातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर बुधवारी सकाळी दोघांचे मृतदेह मिळाले. आई-मुलगीच्या रुपात दोघींची ओळख पटली. जीआरपीने सोशल मीडियावर त्यांचे फोटो पोस्ट करुन ओळख पटवली. चार ते पाच तासांनी समजल की ही आई आणि मुलगी आहे. नोनहरा पोलीस ठाणे क्षेत्रातील त्या फरीद गावच्या रहाणाऱ्या होत्या. रीता देवीचा नवरा रमेश गुप्ता दुबईत नोकरी करायचा. एक महिन्यापूर्वी तो गावी आला होता.
….आणि झोपायला निघून गेला
सर्वकाही व्यवस्थित चालू होतं. मंगळवारी संध्याकाळी रमेश बाहेर फिरुन आला. पत्नी रीताने त्याला जेवण दिलं. भूख नसल्याच सांगून त्याने जेवायला नकार दिला. पत्नी वारंवार जेवणासाठी त्याच्यामागे लागली होती. त्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. त्याने रागाच पत्नीच्या दोन कानाखाली मारले आणि झोपायला निघून गेला.
मुलगी तिच्यामागे जात होती
पत्नीच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. रात्रभर तिच्या मनात राग धुमसत होता. सकाळ होताच ती घरातून बाहेर पडली. आईला घराबाहेर पडताना मोठी मुलगी रिया गुप्ताने पाहिलं. ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. पण रिता ऐकली नाही. मुलगी तिच्यामागे जात होती. या दरम्यान खालिसरपूर येथे रीता रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसली. मुलीने आईची समजूत काढण्याचे बरेच प्रयत्न केले. पण काही फायदा झाला नाही.
काहीवेळाने तिचा सुद्धा मृत्यू
त्याचवेळी ट्रॅकवरुन ट्रेन गेली. अचानक रीताने ट्रेनसमोर उडी मारली. आईला उडी मारताना पाहून मुलीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ट्रेनच्या धडकेत ती जखमी झाली. काहीवेळाने तिचा सुद्धा मृत्यू झाला. छोट्याशा घरगुती वादातून दोन जणांचे जीव गेले.