कुंवर सिंह अचानक घरी आला, रुमचा दरवाजा उघडला, समोरच दृश्य पाहताच थेट कुऱ्हाड उचलली, आणि…
कुंवर सिंह दिल्लीवरुन अचानक आपल्या घरी आला. त्याने त्याच्या येण्याची कोणाला कल्पना दिली नव्हती. घरी आल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळणार? याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. त्याने रुमचा दरवाजा उघडताच त्याला धक्का बसला.
कुठल्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो, एकदा विश्वासाला तडा गेला की, माणूस कोणाचच ऐकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुंवर सिंह दिल्लीत एका कंपनीत मजुरीच काम करायचा. तिथे नोकरी करुन तो कुटुंबाच पालन पोषण करत होता. गुरुवारी रात्री तो दिल्लीवरुन अचानक आपल्या घरी आला. त्याने त्याच्या येण्याची कोणाला कल्पना दिली नव्हती. घरी आल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळणार? याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. त्याने रुमचा दरवाजा उघडताच त्याला धक्का बसला. समोरच दृश्य पाहून तो प्रचंड संतापला. उत्तर प्रदेशच्या जालौनमधील ही दुहेरी हत्याकांडाची घटना आहे.
या धक्कादायक घटनेबद्दल गावात समजताच ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तात्काळ या निर्घृण हत्याकांडाची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. कुंवर सिंहने रुमचा दरवाजा उघडला, त्यावेळी आरती (32) आणि छक्की ठाकूर (40) यांना त्याने नको त्या अवस्थेत पकडलं. नवरा घरी नाही म्हणून आरतीने छक्की ठाकूरला घरी बोलावलेलं. बंद खोलीत दोघांचे प्रेमसंबंध सुरु असताना कुंवर सिंह अचानक तिथे येऊन धडकला.
आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं
त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. त्याचा संताप इतका अनावर झाला की, त्याने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली व दोघांची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने गावात एक खळबळ उडालेली आहे.
‘तेव्हा माझं रक्त खवळलं’
कुंवर सिंहला पोलिसांनी नंतर पकडलं. त्याने पोलिसांना सांगितलं की, “मला अनेक लोकांनी सांगितलेलं की माझ्या बायकोच छक्की सोबत प्रेम प्रकरण सुरु आहे. मी तिला विचारलं, तेव्हा तिने नकार दिला. पण जेव्हा मी दोघांना एकत्र बघितलं, तेव्हा माझं रक्त खवळलं. माझ्यासमोर पर्याय नव्हता. मी रागात येऊन दोघांची हत्या केली”