Extramarital Affair : बेडरुमचा दरवाजा उघडला, समोर पत्नी माधुरीला नको त्या अवस्थेत पाहून पवनने थेट…
Extramarital Affair : त्यावेळी माधुरीचा नवरा पवन अचानक घरी आला. त्याने बेडरुमचा दरवाजा उघडताच नको ते दुश्य पाहिलं. सुरुवातीला त्याला विश्वासच बसला नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधांच्या प्रकरणात एका युवकाची कुऱ्हाडीने कापून हत्या करण्यात आली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय. आरोपी फरार असून त्यााच शोध सुरु आहे. आरोपीला लवकरच पकडू असं पोलिसांनी सांगितलय. शनिवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये ही हादरवून सोडणारी घटना घडली. या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुठौंद पोलीस ठाणे क्षेत्रातंर्गत येणाऱ्या ग्राम सुरावली गावची ही घटना आहे.
इथे राहणाऱ्या 36 वर्षीय संदीपच गावात राहणाऱ्या माधुरीसोबत मागच्या चार वर्षांपासून अफेयर होतं. माधुरीच लग्न झालेलं. संदीप आणि माधुरीमध्ये अनैतिक संबंध होते. शनिवारी संध्याकाळी माधुरीच्या बोलवण्यावरुन संदीप तिच्या घरी गेला. त्यावेळी माधुरीचा नवरा पवन अचानक घरी आला. त्याने बेडरुमचा दरवाजा उघडताच संदीप आणि माधुरीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. ते दुश्य पाहून पवनचा संयम सुटला. त्याने जवळ ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि संदीपवर हल्ला केला.
आवाज ऐकून पवनचा भाऊ राम जी तिथे आला
आरडाओरडा आवाज ऐकून पवनचा भाऊ राम जी तिथे आला. त्याने सुद्धा संदीपवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला. आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक तिथे जमले. ते जखमी संदीपला घेऊन जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. त्याची स्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना हायर सेंटरला घेऊन जाण्यास सांगितलं. कुटुंबीय त्याला उरई येथे घेऊन आले. पण तो पर्यंत त्याने प्राण सोडले होते. गुन्ह्याची माहिती मिळताच कुठौंद पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय ब्रह्म तिवारी पोलीस टीमसह तिथे पोहोचले. त्यांनी संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणात पोलीस अधीक्षक प्रदीप कुमार वर्मा यांनी सांगितलं की, संदीपची हत्या झाली आहे. हत्या करणाऱ्या पवनच्या पत्नीसोबत संदीपचे अनैतिक संबंध होते. म्हणूनच ही हत्या करण्यात आली. सध्या तपास सुरु आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.