मन सुन्न करणारी घटना, हॉस्पिटलध्ये लहान मुलांच्या वॉर्डमध्ये अग्तिनतांडव, 10 बालकांचा मृत्यू
Maharani Lakshmibai Medical College Hospital Fire : एका हॉस्पिटलच्या NICU विभागात शुक्रवारी रात्री भीषण आग भडकली. या दुर्घटनेत 10 लहान मुलांचा मृत्यू झाला असून 16 मुलं जखमी झाली आहेत. NICU हा लहान मुलांचा वॉर्ड आहे.
महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली. या आगीत होरपळून 10 मुलांचा मृत्यू झाला आहे, 16 जखमी झालेत. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजच्या NICU मध्ये शुक्रवार रात्री 10.45 च्या सुमारास ही आग लागली. जिल्हाधिकारी (डीएम) अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये हे हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असं डीएमने सांगितलं. चिंताजनक प्रकृती असलेल्या बालकांना NICU मध्ये ठेवलं जातं. NICU च्या अंतर्गत विभागात 30 मुलं होती. त्यातील बहुतांश बालकांना वाचवलं असं झांसीचे कमिश्नर बिमल कुमार दुबे यांनी सांगितलं. झांसीचे वरिष्ठ पुलिस अधिक्षक (एसएसपी) सुधा सिंह यांनी सांगितलं की, 16 मुलांवर उपचार सुरु आहेत. घटनेच्यावेळी NICU मध्ये 50 पेक्षा जास्ता मुलं होती.
झांसीच्या जवळ असलेल्या महोबा जिल्ह्यातील एका जोडप्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 13 नोव्हेंबरला सकाळी 8 च्या सुमारास या जोडप्याच्या आयुष्यात एका गोंडस बाळाच आगमन झालं होतं. पण आता त्यांच्या आयुष्यात दु:ख आहे. आगीमध्ये होरपळून त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार कसे मिळतील, ते सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. झांसी जिल्ह्यातील मेडीकल कॉलेडमधील ही दुर्घटना दु:खद आणि ह्दयद्रावक असल्याच योगींनी म्हटलं आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना केलीय.
#WATCH | Jhansi Medical College Fire tragedy | UP Deputy CM Brajesh Pathak says, ” In February, the fire safety audit was done. In June, a mock drill was also done. How this incident happened and why it happened, we can only say something about it once the probe report comes…7… pic.twitter.com/KTQe1Y5Sc3
— ANI (@ANI) November 16, 2024
फायर सेफ्टी ऑडिट झालेलं का?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशावरुन उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक झांसी येथे पोहोचले आहेत. पाठक यांनी सांगितलं की, “फेब्रुवारी महिन्यात फायर सेफ्टी ऑडिट झालं होतं. जून महिन्यात मॉक ड्रील सुद्धा झालेलं. ही घटना का आणि कशी झाली, या बद्दल चौकशी अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल” 7 नवजात अर्भकांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. 3 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाही. मृत मुलांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची तर जखमी मुलांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.