धक्कादायक, राजकीय नेत्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, DNA सॅम्पल झाले मॅच
नेता खोलीच्या आत पीडित मुलीसोबत दुष्कृत्य करत होता, त्यावेळी आत्या दरवाजाच्या बाहेर उभी होती. पीडित मुलीने आत्येकडे वाचवण्याची विनंती केली. पण आत्या शांत होती. तिने काहीच केलं नाही.
कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणावरुन संपूर्ण देशात निर्माण झालेलं वादळ शांत झालेलं नसताना आता आणखी एक प्रकरण समोर आलय. समाजवादी पक्षाच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप आहे. सपा नेता नवाब सिंहचे DNA सॅम्पल पीडितेसोबत मॅच झालय. पीडित मुलीने केलेला आरोप सिद्ध झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात नवाब सिंह यादवला 11 ऑगस्टला अटक केली होती. पीडितेच्या आरोपानंतर नवाब सिंह यादवचे डीएनए सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधील हे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच हे प्रकरण आहे.
पीडित मुलीने तिच्यासोबत काय घडलं? ते पोलिसांना सांगितलेलं. सपा नेता नवाब सिंह विरोधात लिखित तक्रार केली होती. पीडितेच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी आरोपी नवाब सिंहला अटक केली होती. पोलिसांनी पीडित मुलीची मेडीकल तपासणी केली. मेडिकल रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी बलात्काराची पुष्टी केली होती.
आत्याच मुलीला नेत्याकडे घेऊन गेली
या बलात्कार प्रकरणात पीडितेच्या आत्येला सुद्धा आरोपी बनवण्यात आलं आहे. आत्येवर मुलीला नवाब सिंहकडे घेऊन गेल्याचा आरोप आहे. सपा नेता खोलीच्या आत पीडित मुलीसोबत दुष्कृत्य करत होता, त्यावेळी आत्या दरवाजाच्या बाहेर उभी होती. पीडित मुलीने आत्येकडे वाचवण्याची विनंती केली. पण आत्या शांत होती. तिने काहीच केलं नाही. पीडितेच्या आरोपानंतर पोलिसांनी आत्येला सुद्धा अटक केलीय.
नवाब सिंह आक्षेपार्ह अवस्थेत दिसला
पीडितेने पोलिसांना सांगितलं की, नवाब सिंह यादवने तिला तिर्वा येथील मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीला लावण्याचा आश्वासन दिलं होतं. त्यासाठी ती चौधरी चंदन सिंह महाविद्यालयात गेली. ती रात्री 11 वाजता कॉलेजमध्ये पोहोचली. या घटनेनंतर तिने आत्येचा मोबाइल घेतला व पोलिसांना सर्वकाही सांगितलं. थोड्याचवेळात पोलीस तिथे पोहोचले. याचा एक व्हिडिओ समोर आलाय. नवाब सिंह आक्षेपार्ह अवस्थेतत खोलीमध्ये दिसतोय.
लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याबरोबर तिचं पटेनास झालं
आरोपी आत्येने सुरुवातीपासून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सपा नेत्याला फसवलं जातय असं आत्येच म्हणण होतं. आत्यात कन्नौज तिर्वा क्षेत्राची निवासी आहे. तिच लग्न कन्नौजच्या तालग्राम भागात झालं. नवरा खासगी नोकरी करतो. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याबरोबर तिचं पटेनास झालं. आरोपी आत्या नवाब सिंहला सात वर्षांपासून ओळखत होती.