Extramarital Affair : वयाची पन्नाशी ओलांडलेली चार मुलांची आई पडली 18 वर्षाच्या मुलाच्या प्रेमात, त्यानंतर असं घडलं की…

Extramarital Affair : प्रेमात कुठलही बंधन नसतं असं म्हणतात. प्रेम कुठल्याही वयात होतं. प्रेमाला कुठलही बंधन नसलं, वयाची मर्यादा नसली, तरी काही मर्यादा या पाळाव्याच लागतात. त्याचा विसर पडला, तर अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. अशीच एक घटना घडली आहे.

Extramarital Affair : वयाची पन्नाशी ओलांडलेली चार मुलांची आई पडली 18 वर्षाच्या मुलाच्या प्रेमात, त्यानंतर असं घडलं की...
Extramarital Affair Image Credit source: Representative Image
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 3:15 PM

असं म्हणतात प्रेमात कुठलही बंधन नसतं. प्रेम कुठल्याही वयात होतं. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये असच एक प्रकरण समोर आलं आहे. इथे चार मुलांची आई तिच्यापेक्षा वयाने 33 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. हे प्रेम या टोकाला पोहोचलं की, ती प्रियकरासोबत पळून गेली. महिलेच्या मुलीने आईचा शोध घेण्याची पोलिसांना विनंती केली. पोलिसांनी महिलेला शोधून काढलं, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड गोंधळ झाला.

साढ पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुंडनी भागातील गावात ही 51 वर्षाची महिला राहते. तिचा नवरा बाहेरगावी नोकरी करतो. त्याला चार मुलं आहेत. सर्वात मोठ्या मुलीच लग्न झालय. अन्य तीन मुलं घरातच राहतात. गावापासून पाच किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या एका 18 वर्षीय मुलासोबत या महिलेची ओळख झाली.

महिलेच्या मुलांना याबद्दल समजल्यानंतर त्यांनी…

हळू-हळू दोघांची ओळख मैत्रीत बदलली. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लपून-छपून भेटायला सुरुवात केली. 18 वर्षाचा तिचा प्रियकर महिलेच्या घरी येऊ-जाऊ लागला. महिलेच्या मुलांना तिच्या या प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विरोध सुरु केला. प्रियकराला त्यांनी धमकावलं. मात्र, त्यानंतरही महिला आणि तिच्या प्रियकराच भेटणं बंद झालं नाही.

गावाच्या बाहेर शेतामध्ये भेटायचे

दोघे गावाच्या बाहेर शेतामध्ये भेटायचे. त्यावेळी मुलांनी आपल्या आईवर नजर ठेवायला सुरुवात केली. एक दिवस संधी साधून महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. महिला तिच्या प्रियकराच्या घरी राहू लागली. महिलेच्या मुलाना जेव्हा याबद्दल समजलं, तेव्हा अब्रू जाईल म्हणून सर्वप्रथम त्यांनी घराच्या बाहेर पडणं बंद केलं. त्यानंतर मुलीच्या विवाहित मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आईला शोधण्याची विनंती केली.

सोबतच राहण्याची जिद्द करु लागले

मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु केला. पोलिसांनी लवकरच दोघांना शोधून काढलं. दोघांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं. महिला आणि तिचा प्रियकर काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. सोबतच राहण्याची जिद्द करु लागले. पोलीस स्टेशनमध्ये मोठा गोंधळ घातला. बरच समजावल्यानंतर दोघांना त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवलं. आता ही लव्ह स्टोरी संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.