‘प्रत्येक गोष्ट ऐकणार, तुम्ही तर माझ्या….’, दीर फोनवरुन वहिनीला असं बोलला की, आता थेट….
महिलेच्या म्हणण्यानुसार, 11 मे रोजी मोबाइलवर दीर अतुल चौहानचा व्हॉट्स अप मेसेज आला. मेसेजमध्ये त्याने लिहिलेलं वहिनी फोन तर उचला.
दीर-वहिनीच नातं आई-मुलगा, भाऊ-बहिण किंवा मैत्रीच असतं. पण काही लोक या नात्याला कलंकित करतात. असच एक प्रकरण समोर आलय. एका महिलेने आपल्या दीरावर फोन करुन अश्लील बोलत असल्याचा आरोप केलाय. दीराला असं बोलण्यापासून रोखल्यानंतर त्याने शिवीगाळ केली असा आरोप महिलेने केलाय. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय. उत्तर प्रदेशच्या नोएडामधील हे प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या महिलेने दीरावर फोनवरुन घाणेरड बोलत असल्याचा आरोप केलाय. दीराने फोनवरुन बोलताना शिवीगाळ सुद्धा केली. पोलिसात तक्रार नोंदवणारी ही महिला सेक्टर 168 मधल्या सोसायटीत राहते.
मे महिन्यात नवरा आणि दीरामध्ये कुठल्यातरी गोष्टीवरुन भांडण झालं. वाद इतका वाढला की, दोघांनी परस्परांना शिवीगाळा केली आणि बोलायचे बंद झाले. महिलेच्या म्हणण्यानुसार, 11 मे रोजी मोबाइलवर दीर अतुल चौहानचा व्हॉट्स अप मेसेज आला. मेसेजमध्ये त्याने लिहिलेलं वहिनी फोन तर उचला. तुम्ही वहिनी आई आहात, आम्ही तुमच म्हणण ऐकू. तो मेसेज वाचून मला असं वाटलं की, दीराला भावासोबत म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत वाईट वागला त्याचा पश्चाताप होतोय.
त्याच्या अशा वागण्याला मी कंटाळली
त्यानंतर मी दीराला फोन केला. पण दीराने माझ्यासोबत अश्लील बोलणं सुरु केलं. मी त्याला रोखलं, त्यावेळी त्याने मला शिवीगाळ केली. मी त्याचं सर्व बोलण रेकॉर्ड केलं. पण तो सुधारला नाही. आधी मी दीराच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केलं. पण मध्ये-मध्ये फोन करुन तो अशा हरकती करायचा. त्याच फोन करणं वाढलं. दीर डेहराडूनच्या रानीपोखरी येथे राहतो. त्याच्या अशा वागण्याला मी आता कंटाळली आहे. महिलेने आरोपी दीराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय. आरोपी विरोधात कारवाई करणार असल्याच पोलिसांनी म्हटलय.