Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकतर्फी प्रेमातून बलात्कार, तरुणीसह कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

तरुणीच्या मोबाईलमधील शेवटच्या मेसेजच्या आधारे पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अटक करण्यात आलेला तरुण तरुणीच्या मोबाईलवर सतत मेसेज पाठवत असे. हत्येच्या दिवशी तरुणाने तरुणीच्या मोबाईलवर शेवटचा मेसेज केला होता.

एकतर्फी प्रेमातून बलात्कार, तरुणीसह कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या, आरोपीला अटक
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 12:35 PM

लखनौ : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील फाफामऊ भागात चौघा जणांच्या सामूहिक हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी पवन सरोजचा मुलीला त्रास देत होता. सोबतच तो तिच्या मोबाईलवर वारंवार मेसेज पाठवत होता, मात्र मुलगी त्याच्या मागण्या धुडकावून लावत होती. अखेर एकतर्फी प्रेमातून आरोपीने मुलीसह कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येपूर्वी तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती वैद्यकीय अहवालातून समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले होते. तसेच दोन पोलिसांनाही निलंबित करण्यात आले आहे. आरोपी पवन सरोज पोलिसांसमोर वारंवार आपला जबाब बदलत होता. मयत मुलीच्या मोबाईलवरील शेवटचा मेसेज, वैज्ञानिक पुरावे यांचा आधार आणि तपासात सहकार्य न केल्याने पवन सरोजला अटक करण्यात आली. या हत्येतील अन्य आरोपींच्या सहभागाबद्दल पोलीस तपास करत आहेत.

मृत तरुणीच्या भावासोबत वाद

कॉल डिटेल्स, डीएनए प्रोफाईलच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. आरोपीचा मृत तरुणीच्या भावासोबत वाद झाल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात नाव असलेल्या आरोपींविरुद्ध पोलिसांना कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. कॉल डिटेल्स, डीएनए निकालाच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास केला जाईल. डीएनए प्रोफाइलनंतर चौघांच्या सामूहिक हत्येचे गूढ उकलले जाऊ शकते.

आय हेट यू असा शेवटचा मेसेज

एडीजी प्रेम प्रकाश यांनी ट्विट करुन या प्रकरणाची माहिती दिली. एकतर्फी प्रेमातून ही सामूहिक हत्या करण्यात आली आहे. पवन सरोजने मुलीच्या मोबाईलवर मेसेज केला होता. मुलीने आय हेट यू असा शेवटचा मेसेज पवन सरोजला पाठवला. या मेसेजच्या आधारे प्रयागराज पोलीस पवनची चौकशी करत आहेत.

प्रयागराजच्या फाफामऊ भागात झालेल्या एकाच कुटुंबातील चौघा जणांच्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्याच्या अंतिम टप्प्यावर पोलीस आहेत. मृत तरुणी ही हुशार विद्यार्थिनी होती. तिने छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठातून पदवी घेतली होती. विविध स्पर्धा परीक्षांची ती तयारी करत होते.

एडीजी प्रेम प्रकाश यांनी काय सांगितलं

तरुणीच्या मोबाईलमधील शेवटच्या मेसेजच्या आधारे पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अटक करण्यात आलेला तरुण तरुणीच्या मोबाईलवर सतत मेसेज पाठवत असे. हत्येच्या दिवशी तरुणाने तरुणीच्या मोबाईलवर शेवटचा मेसेज केला होता. तेव्हापासून तिच्या मोबाईलवर कोणताही मेसेज आला नाही. अटक करण्यात आलेल्या तरुणाच्या अंगावर जखमेच्या खुणा आणि रक्ताचे डागही आढळून आले आहेत.

सामूहिक बलात्कारानंतर हत्या

अटक करण्यात आलेला तरुण पोलिस तपासात सहकार्य करत नाही. गुन्ह्याची कबुलीही त्याने दिलेली नाही. एडीजी प्रेम प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. तिच्या घरातून मिळालेल्या तिच्या शैक्षणिक नोंदीनुसार ती प्रौढ आहे. मात्र, या सामूहिक हत्याकांडात अजूनही असे अनेक न सुटलेले प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं पोलिसांकडे नाहीत. पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाची डीएनए चाचणी करण्याची तयारी केली आहे.

मृत तरुणी अल्पवयीन नाही

मृत तरुणीच्या मोबाईलवरुन तिच्या वयाचा पुरावा सापडला आहे. त्यात तिची जन्मतारीख 4 जून 1996 अशी लिहिली आहे. या प्रकरणात, POCSO चे कलम कमी केले जात आहेत. मृत तरुणीवर बलात्कार झाल्याची पुष्टी मिळाली आहे. तर तिच्या आईवर बलात्कार झाल्याची पुष्टी होऊ शकली नाही. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत.

संबंधित बातम्या :

व्हिस्की खरेदीच्या नादात दादरमधील 74 वर्षीय अभिनेत्रीची फसवणूक, 3 लाखांचा ऑनलाईन गंडा

बेटा आय मिस यू, व्हॉट्सअपवर स्टेटस, सासरच्या जाचाला कंटाळून जावयांची आत्महत्या

प्रेयसीच्या बापाकडून प्रियकराचा सिनेस्टाईल खून, मृतदेह शेतात पुरला, महिन्याभराने उलगडा

सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.