हे राम… पुजारीने केली 30 कोटींच्या मूर्तीची चोरी, बड्या पक्षाचा राष्ट्रीय महासचिव ‘पाप’त सहभागी

Crime News: मंदिरातून मूर्ती चोरी करणारे दुसरा तिसरा कोणी नाही तर मंदिराचे पुजारी आणि फिर्याद देणारे वंशीदास निघाले. त्यांनी आपला वेगळा मठ निर्माण करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत मूर्तीची चोरी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या मूर्तीची किंमत 30 कोटी रुपये आहे.

हे राम... पुजारीने केली 30 कोटींच्या मूर्तीची चोरी, बड्या पक्षाचा राष्ट्रीय महासचिव ‘पाप’त सहभागी
या मूर्तींची चोरी झाली होती.
Follow us
| Updated on: Jan 18, 2025 | 8:37 PM

Crime News: उत्तर प्रदेशातील भगवान राम जानकी मंदिरात अष्टधातूच्या मूर्तीची चोरी झाली होती. 30 कोटी रुपयांचे मूल्य असलेल्या राम-लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्ती चोरी प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात मंदिरातील पुजारीच चोर निघाला. त्याच्या या पापात सहभाग समाजवादी पक्षाच्या बड्या नेत्याने दिला. या प्रकरणी पोलिसांनी पुजारी, समाजवादी पक्षाच्या नेत्यासह चार जणांना अटक केली आहे.

कुठे घडली घटना

उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्यातील कठिनई गावात ऐतिहासिक राम जानकी मंदिर आहे. या मंदिरातून 14 जानेवारी रोजी प्राचीन अष्टधातूच्या मूर्तीची चोरी झाली होती. याबाबत मंदिराचे पुजारी वंशीदास यांनी पडरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुजारीच निघाले चोर

मंदिरातून मूर्ती चोरी करणारे दुसरा तिसरा कोणी नाही तर मंदिराचे पुजारी आणि फिर्याद देणारे वंशीदास निघाले. त्यांनी आपला वेगळा मठ निर्माण करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत मूर्तीची चोरी केली. पोलिस चौकशीत पुजारी वंशीदास यांनी सांगितले की, महाराज जयराम दास आणि सतुआ बाबा यांच्यात मंदिराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. जयराम दास यांनी वाद संपल्यावर मला संपत्ती देण्याचे मान्य केले होते. परंतु ते मंदिराची सर्व सत्ता माझ्याऐवजी त्यांच्या पुतण्याकडे देणार होते. यामुळे पुजारी वंशीदास बाबा यांनी प्रयागराज समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंह युवा ब्रिगेडचे राष्ट्रीय सचिव राम बहादूर पाल यांना माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

असा ठरला प्लॅन

पुजारींनी मूर्ती राम बहादूर पाल, त्यांचे चालक लवकुश पाल, मुकेश कुमार सोनी यांना दाखवली. त्यानंतर मूर्ती अष्टधातूची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुजारी वंशीदास आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मूर्ती मंदिरातून चोरुन हैमाई पहाडी मंदिरात लपवली. परंतु जेव्हा ते मूर्ती घेण्यास गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या मूर्तीची किंमत 30 कोटी रुपये आहे. या प्रकरणात पुजारी बंशीदास त्यांना साथ देणारे लवकुश पाल, मुकेश कुमार सोनी आणि राम बहादूर पाल यांना अटक केली आहे. बंशीदास यांना ही अष्टधातूची अत्यंत मौल्यवान मूर्ती चोरून विकल्यानंतर स्वत:चा वेगळा मठ तयार करायचा होता.

सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.