छतावरुन बायका लग्नाची वरात पाहत होत्या, पण त्यावरुन मोठा राडा, दगडफेक, लाठीमार असं का झालं?
कुठल्याही लग्नात वरात पाहण्याची संधी कोणी सोडत नाही. शहरात किंवा गावात महिला बाहेर जाऊन वरात पाहतात. छत असेल तर छतावर जाऊन वरात पाहतात. उंचावरुन वरात पाहण्याचा एक वेगळा आनंद असतो. या लग्नात सुद्धा महिला छतावरुन वरात पाहत होत्या. पण त्यावरुन मोठा राडा झाला.
लग्नामुळे फक्त दोन मनंच नाही, तर दोन कुटुंब जोडली जातात. लग्नाच्यावेळी अनेकदा मानपमनाचे प्रकार घडतात. पण त्या मंगलक्षणी अशा गोष्टी फार कोणी मनाला लावून घेत नाही. अपवादानेच काही लग्नामध्ये काही गोष्टींवरुन वाद विकोपाला जातात. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये लग्नाच्या वरातीमध्ये असाच एक मोठा राडा झाला. युवती आणि महिला घराच्या छतावर बसून लग्नाची वरात पाहत होत्या. त्याचवेळी वरातीला आलेले लोक जेसीबीवर बसून त्यांचा व्हिडिओ बनवू लागले. वऱ्हाडी मंडळींना असं करण्यापासून रोखलं. त्यावरुन मोठा राडा झाला. आधी दोन्ही बाजूंमध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर वाद वाढतच गेला.
वाद इतका वाढला की की, वऱ्हाडी आणि गावकऱ्यांमध्ये तुफान दगडफेक झाली. दगड लागून जखमी झाल्याने लोकांच्या नाका-तोंडाडून रक्त वहात होतं. लग्नाच्या घरात मोठा तणाव निर्माण झालेला. दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या चौघांना अटक करुन तुरुंगात पाठवलं. घटनेचे व्हिडिओ समोर आले असून रस्त्यावर कशा प्रकारे दगडफेक सुरु होती, ते यातून दिसतं.
पोलिसांनी काय केलं?
सहारनपुरच्या बेगी रुस्तम गावात एक वरात आलेली. वरातीमधील काही युवक जेसीबीवर बसून मोबाईलने गावातील मुलींचा व्हिडिओ बनवत होते. हे कृत्य पाहून मुलीकडची मंडळी आणि गावातील लोकांनी याचा विरोध केला. वऱ्हाड्यांना हे पटलं नाही. त्यांनी वाद घातला. पाहता-पाहता वऱ्हाडी आणि मुलीकडची मंडळी सोबत गाववाले यांच्यात दगडफेक सुरु झाली. प्रचंड मोठा राडा झाला. काही गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. सोशल मीडियावर हे व्हिडिओ पोस्ट केलेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारावर चौघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. दगडफेक करुन कायदा हातात घेणाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असल्याच सहारनपुरचे एसपी सागर जैन यांनी म्हटलं आहे.