पोटची आई आणि भाऊ मिळून 23 वर्षाच्या मुलीला जंगलात घेऊन गेले, तिथे त्यांनी जे केलं ते धक्कादायक
Crime News | जंगलात नेऊन काय केलं? आईनेच पोटच्या लेकीबाबत इतक टोकाच पाऊल का उचललं?. पोलिसांनी मुलीची आई आणि तिच्या भावाला ताब्यात घेतलं आहे. तिच अजून लग्न झालेलं नाहीय.
लखनऊ : कुटुंबीयांनीच घरातील 23 वर्षीय मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेत मुलगी 70 टक्के भाजली आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. अधिक चांगल्या उपचारांसाठी तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यात नावादा खुर्द गावात ही घटना घडली. पोलिसांनी मुलीची आई आणि तिच्या भावाला ताब्यात घेतलं आहे. कुटुंबीयानी आपल्या लेकीबरोबर असं का केलं? इतक टोकाच पाऊल का उचललं? त्याची चर्चा सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी गर्भवती होती. तिच अजून लग्न झालेलं नाहीय.
पीडित मुलीचे त्याच गावातील एका युवकासोबत शरीरसंबंधत होते. त्यातून ती गर्भवती राहिली. कुटुंबीयांना याबद्दल समजल्यानंतर ते प्रचंड संतापले. गुरुवारी 28 सप्टेंबरला मुलीची आई आणि भाऊ तिला घरापासून जवळ असलेल्या जंगलात घेऊन गेले. तिथे त्यांनी मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकलं व तिला पेटवून दिलं. भाजल्यामुळे पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय. अब्रू जाईल ही भीती
हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार अग्रवाल म्हणाले की, मुलीची आई आणि भावाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी तपास सुरु आहे. लग्नाआधी मुलगी गर्भवती आहे, हे समजल्यानंतर कुटुंबाची अब्रू जाईल ही भीती आईला आणि भावाला होती. त्यातून त्यांनी जीवे मारण्यासारख टोकाच पाऊल उचलल असण्याची शक्यता आहे.