विळ्याने डोकं उडवून जन्मदात्रीची हत्या, आरोपीविरुद्ध पत्नीचीही साक्ष, पाताळयंत्री मुलाला फाशीची शिक्षा

7 ऑक्टोबर 2019 रोजी उत्तराखंडमधील पाताळयंत्री मुलाने आईचे डोके धडावेगळे केले होते. या घटनेदरम्यान काही लोक मदतीसाठी आले असता आरोपी मुलगा डिगर सिंहने त्यांच्यावरही हल्ला केला होता.

विळ्याने डोकं उडवून जन्मदात्रीची हत्या, आरोपीविरुद्ध पत्नीचीही साक्ष, पाताळयंत्री मुलाला फाशीची शिक्षा
crime News
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 2:44 PM

नैनिताल : डोकं उडवून स्वत:च्या आईची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पाताळयंत्री मुलाला नैनितालमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. कलम 302 अंतर्गत सर्वोच्च शिक्षा सुनावताना न्यायालयाने दोषी डिगर सिंहला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. डिगर सिंहवर कलम 307 अन्वयेही गुन्हाही दाखल करण्यात आला होता, त्याअंतर्गत दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला आजन्म कारावास आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायालयाचे प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश प्रीतू शर्मा यांच्या आदेशानुसार सिंह याला दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. बुधवारी न्यायालयाच्या या आदेशानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

सरकारी वकील सुशील कुमार शर्मा यांनी सांगितले की, 7 ऑक्टोबर 2019 रोजी चोरगलिया येथील उदयपूर रेक्वाल क्विरा फार्ममधील या घटनेत मुलाने आईचे डोके धडावेगळे केले होते. या घटनेदरम्यान काही लोक मदतीसाठी आले असता डिगर सिंहने त्यांच्यावरही हल्ला केला होता. त्याच दिवशी मयत महिलेचे पती सोबन सिंह यांनी मुलगा डिगर सिंह याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर चोरगलिया पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबन सिंग यांच्या आरोपानुसार, पत्नी जोमती देवीसोबत मुलाचा घरात अचानक वाद झाला आणि अचानक डिगरने विळ्याने वार करुन जन्मदात्या आईचा शिरच्छेद केला.

साक्षीदारांचे जबाब काय?

साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार डिगर सिंह हा आपल्या घराच्या अंगणात आईच्या मानेवर विळ्याने वार करत होता. त्याने तिच्या डोक्याचे केस एका हाताने धरले होते. आई जिवाच्या आकांताने ओरडत होती. आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारी देवकी देवी आणि डिगरची पत्नी नयना कोरंगा घटनास्थळी आल्या होत्या, त्यानंतरही डिगरने हल्ला करणे थांबनले नाही. डिगरच्या पत्नीनेही आपल्या पती विरोधात साक्ष दिली. गुन्हा सिद्ध करण्यासाठी डझनभर साक्षीदार न्यायालयात हजर करण्यात आले होते.

फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालातही हा हल्ला विळ्यानेच झाल्याची पुष्टी मिळाली आहे. सरकारी वकील सुशील शर्मा यांनी असेही सांगितले की, 5 मार्च 2020 रोजी या प्रकरणात आरोपीवर कलम 307 ही लावण्यात आला होता. 25 फेब्रुवारी 2021 पासूनच हा खटला सुरु झाला होता. न्यायालयाने नऊ महिन्यांनी या खटल्याचा निकाल दिला.

संबंधित बातम्या :

शारीरिक संंबंधांनी कर्करोग बरा करण्याचा दावा, हॉटेलमध्ये डॉक्टर अर्धनग्नावस्थेत सापडला

कुर्ल्यात 20 वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, इन्स्टा व्हिडीओ शूटिंगसाठी गेलेल्या तरुणांना आढळला मृतदेह

भिंतीवर सुसाईड नोट, कुटुंबातील पाच जणांसह कुत्र्यालाही विष दिलं, आजी-नातीचा मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.