Yavatmal Crime : रुग्ण वैदूकडे औषध घ्यायला गेला तर समोरील दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली, काय घडलं नेमकं?

रुग्ण वैदू बाबाकडे औषधी घ्यायला आला. झोपडीजवळ येताच त्याला जे दृश्य दिसले त्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

Yavatmal Crime : रुग्ण वैदूकडे औषध घ्यायला गेला तर समोरील दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली, काय घडलं नेमकं?
यवतमाळमध्ये वैदू महाराजसह सेविकेची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 2:28 PM

यवतमाळ / 29 ऑगस्ट 2023 : यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका वैदू महाराजासह त्याच्या सेविकेची हत्या झाल्याची घटना तळेगाव भारी जवळील खाणगाव शिवारात घडली आहे. चरणदास महाराज उर्फ चंपत शेंडे आणि पुष्पा होले अशी मयतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. हत्या नेमकी कुणी आणि कोणत्या उद्देशाने केली? याबाबत अद्याप कळू शकले नाही. मात्र चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

रुग्ण आल्यानंतर घटना उघडकीस

मयत वैदू लक्ष्मण उर्फ चरणदास महाराज उर्फ चंपत शेंडे आणि त्यांच्या सेवेकरी पुष्पा होले हे दोघे खाणगाव येथील मठातील झोपडीत वास्तव करत होते. सज्जनगड मठाचे ते प्रमुख होते. गेली अनेक वर्षे ही जोडी येथे वास्तव्यास आहे. वैदू चरणदास महाराज जटीबुटीद्वारे आजारी व्यक्तींवर उपचार करत होते. यामुळे त्यांना येथील लोकं मानायचे. सकाळी एक रुग्ण वैदू बाबाकडे औषध घ्यायला आला असता, झोपडीतील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

झोपडीत वैदू बाबा आणि त्यांच्या सेविकेचा मृतदेह पडला होता. सदर व्यक्तीने गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी तात्काळ यवतमाळ ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. त्यांच्याकडील रोख आणि दागिने चोरीच्या दृष्टीने ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

श्वान पथक, ठसेतज्ञ आदींना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी भेट घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी पोलीस अलर्ट मोडवर आले असून, परिसरातील संशयिताची माहिती पोलीस घेत आहेत.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.