VIDEO | बहुरूपीच्या वेशात फिरणाऱ्या व्यक्तीमुळे वसईत संशयाचे वातावरण, पाहा व्हिडीओ
VIDEO | वसईत बहुरूपीच्या वेशात फिरणाऱ्या व्यक्तीची दहशत, व्हायरल सीसीटीव्ही नागरिक संतप्त
वसई : वसईच्या (vasai) परिसरात बहुरूपीच्या (Bahurupi) वेशात एकाचवेळी अनेकजण फिरत असल्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ (viral video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामुळे तेथील स्थानिक संतप्त झाले आहेत. पापडी, मुळगांव, रमेदी, वसई या भागात पोलिस आणि नागरिक सुद्धा लक्ष ठेऊन आहेत.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीची खातरजमा झाल्याशिवाय कोणी कसल्याही प्रकारचं कृत्य करु नये असंही आवाहन करण्यात आलं आहे.
खाकी वर्दी घालून हे बहूरूपी वेशातील लोक पापडी, मुळगांव, रमेदी, वसई, विभागात फिरत असल्यामुळे नागरिक सुध्दा चिंतेत आहेत. पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवला आहे.
क्राईमच्या सतत घटना घडत असल्यामुळे नागरिक सुद्धा चिंतेत आहेत. वसई परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस काळजी करीत आहेत.