Video : अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी स्फोटकांनी उडवल्या, उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठी कारवाई
गेल्या दोन दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आणि महसूल विभागानं स्फोटकं लावून वाळू उपसा करणाऱ्या बोटी उडवून दिल्या आहेत.
इंदापूर : इंदापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरु असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. मात्र, आता इंदापूर तालुक्यातील महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या दोन दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आणि महसूल विभागानं स्फोटकं लावून वाळू उपसा करणाऱ्या बोटी उडवून दिल्या आहेत. या कारवाईमुळे वाळू तस्करांना मोठा झटका बसला आहे. (Indapur taluka revenue department and police blew up boats by explosives who carrying illegal sand)
इंदापूर तालुक्यातील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनानं मिळून ही मोठी कारवाई केली आहे. दोन दिवसापूर्वीच उजनी धरणातील अवैद्य पद्धतीने वाळू उपसा करणार्या बोटींवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा उजनी धरणातील अवैद्य वाळू उपसा करणार्या 9 बोटी जिलेटिनच्या सहाय्यानं उडवून देण्यात आल्या. या कारवाईमुळे वाळू तस्करांचं तब्बल 1 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे. यापुढेही वाळू तस्करांवर अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येईल असा दावा तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केलाय.
इतर बातम्या :
Breaking : राज्य मागासवर्ग आयोगाचा मोठा निर्णय, राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव
Sanjay Raut : खासदार संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट, राऊत-गांधी भेटीमागचं कारण काय?
Indapur taluka revenue department and police blew up boats by explosives who carrying illegal sand