Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी, विरारच्या बिझनेसमनचा परमबीर सिंग, प्रदीप शर्मांवर गंभीर आरोप

माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे (Mayuresh Raut Param Bir Singh extortion)

घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी, विरारच्या बिझनेसमनचा परमबीर सिंग, प्रदीप शर्मांवर गंभीर आरोप
परमबीर सिंह, प्रदीप शर्मा
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 12:16 PM

मुंबई : क्रिकेट बुकी सोनू जालाननंतर विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर आरोप केला आहे. 2017 मध्ये पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश दिल्याचा आरोप करणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंगही अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Virar Businessman Mayuresh Raut accusation against former Mumbai CP Param Bir Singh in extortion case)

“खंडणी विरोधी पथकाने तीन दिवस डांबले”

परमबीर सिंह यांच्यासह माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रारीचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे.

“मनसुख हिरेनप्रमाणे गाड्यांचा वापर होण्याची भीती”

2017 मध्ये पोलिसांनी माझ्या घरात दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचाही दावा राऊतांनी केला आहे. पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतलेल्या गाड्यांचा वापर मनसुख हिरेन सारख्या प्रकरणात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. न्यायासाठी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही मयुरेश राऊत यांनी पत्र लिहिलं आहे. दिलीप वळसे पाटलांनी बंगल्यावर बोलावून प्रकरण समजावून घेतल्याची माहिती तक्रारदाराने दिली आहे.

सोनू जालानचा आरोप काय?

क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. 2018 मध्ये परमबीर सिंग यांनी मकोका लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत. सोनू जालान याने पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली.

केतन तन्ना यांच्याकडूनही परमबीर सिंगांवर खंडणीखोरीचा आरोप

केतन तन्ना या व्यक्तीनेही परमबीर सिंह यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंह यांनी आपल्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये उकळले. याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांची चौकशी व्हावी. याप्रकरणात आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केतन तन्ना यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

परमबीर सिंगांनी आमच्याकडून खंडणी उकळली; क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, पोलीस अधिकाऱ्याकडून पहिला गुन्हा दाखल

(Virar Businessman Mayuresh Raut accusation against former Mumbai CP Param Bir Singh in extortion case)

ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....