Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : 28 सेकंदाचा व्हिडीओ, पहिल्या 15 सेकंदातच चोरी झाली! मग दिसली कशी नाही? नीट पाहा

Train Mobile Snatching video : या व्हिडीओमध्ये नेमकी चोरी कोणत्या क्षणी होते, हे लगेच कळत नाही. त्यासाठी बारकाईनं हा व्हिडीओ पुन्हा पाहावा लागतो.

Video : 28 सेकंदाचा व्हिडीओ, पहिल्या 15 सेकंदातच चोरी झाली! मग दिसली कशी नाही? नीट पाहा
धाडसी चोरी...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 11:14 AM

मुंबई : मोबाईल (Mobile use) कोण वापरत नाही? सगळेच वापरतात. मोबाईल वापरण्याचं प्रमाण जसं वाढलं, तसंच मोबाईल चोरांचंही प्रमाण वाढलं. कुठे-कधी कुणाच्या मोबाईलवर चोरटे (Mobile Theft) हात टाकतील, याचा नेम नाही. अशातच एक चोरीचा व्हिडीओ समोर आलाय. 28 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये पहिल्या पंधरा सेकंदाच्या आतच चोरी होते. पण व्हिडीओ (Train mobile snatching video) पाहताना नेमकी चोरी झाली कुठे, हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर कळणारच नाही. त्यासाठी व्हिडीओ पुन्हा स्लो-मोशनमध्ये पाहावा लागतो. तेव्हा जाऊन कळतं, की नेमकी चोरी कशी, कोणत्या मिनिटाला केली गेली. शिवाय हा चोर नेमका होता कुठे, तेही स्लो मोशनमध्ये व्हिडीओ पाहिल्यावरच ध्यानात येत. चोरीची ही घटना आहे घडली एका चालत्या ट्रेनमध्ये. एका खाडीपुलावर ट्रेन जात असते. दोघेजण दरवाजात बसलेले आहेत. रेल्वेच्या डब्यांच्या पायऱ्यांवर त्यांनी पाय टाकलेत. दरवाज्यात प्रवेश करण्याच्या जागी दोघे तरुण बसलेले आहेत. त्यापैकी एकाच्या हातात मोबाईल फोन आहे. दोघंही प्रवासाचा आनंद घेतायत. गाडी जेव्हा पुलावरुन जाऊ लागते, तेव्हा नदीचा नयनरम्य नजारा पाहण्याचा आनंद दोघं घेतात. पण सेकंदापेक्षाही कमी वेळेत असं काहीतरी घडतं, की ज्यावर या दोघांचाही विश्वास बसत नाही.

नेमकी ही घटना समजून घेण्यासाठी आधी व्हिडीओ पाहून घ्या…

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओमध्ये काय?

उत्कर्ष सिंह यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये नेमकी चोरी कोणत्या क्षणी होते, हे लगेच कळत नाही. एक माणूस दरवाजात उभार राहून एक व्हिडीओ रेकॉर्ड करतोय. दोघेजण दरवाजात बसलेत. रेल्वे नदीच्या पुलावरुन जातेय. अशातच अचानक एक जण दरवाजात बसलेल्या तरुणाच्या मोबाईलवर हात साफ करतो. व्हिडीओत चोरटा दिसूनही येत नाही. तो कुठून येतो, चोरी कशी करतो, याची पुसटीशी कल्पना दरवाजात बसलेल्या तरुणांना येत नाही. नवव्या सेकंदाला ही चोरी होते. पण ही चोरीची घटना नेमकी घडते कशी हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहावा लागतो.

कुठे घडली घटना?

ही घटना बिहारमध्ये घडलीय. बिहारच्या बेगूसराय इथं धावत्या ट्रेनमधून मोबाईल लुटण्यात आला. अशाप्रकारे रेल्वे प्रवाशांची लूट होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. मुंबईसह राज्यभरातच नव्हे तर देशभरात सर्रास अशा घटना घडतायत. पण रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या या भामट्यांचा बंदोबस्त कसा करायचा, असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहीनंतर विश्वासच बसला नाहीये. तर काहींनी ही गोष्ट एकदम सामान्य वाटलीय. कुर्ला, मुंब्रा या ठिकाणी अशा चोऱ्या होणं, ही एक कॉमन गोष्ट झाली असल्याची कमेंट एका ट्वीटर युजरने केलीय. तर एकाननं आपल्यासोबतही असाच किस्सा घडल्याचंही म्हटलंय. 2013 साली बोकारो ते नवी दिल्ली प्रवासादरम्यान अलाहाबादजवळ गंगा नदीच्या पुलावर जेव्हा गाडी जात होती, तेव्हा माझ्यासोबत अशीच फोन चोरीची घटना घडली होती, असं एकानं म्हटलंय.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.