बहीण-भावाच्या अंगावर पाण्याची टाकी कोसळली; नाशिकमध्ये 4 वर्षांची मुलगी ठार
बहीण-भावाच्या अंगावर पाण्याची टाकी कोसळल्याची हृदयद्रावक घटना नाशिकमध्ये घडली आहे. यात एक 4 वर्षांची मुलगी ठार झाली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नाशिकः बहीण-भावाच्या अंगावर पाण्याची टाकी कोसळल्याची हृदयद्रावक घटना नाशिकमध्ये घडली आहे. यात एक 4 वर्षांची मुलगी ठार झाली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या अतिशय वाईट अशा घटनेची सविस्तर माहिती अशी की, नाशिकमधल्या पाथर्डी फाटा परिसरात अमृतनगर भाग येतो. या भागात अतिशय विरळ वस्ती आहे. मोजकी घरे आहेत. येथे एक सात घरांची चाळ आहे. या चाळीसाठी वापरण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी एक टाकी बांधण्यात आली होती. जवळपास दहा फूट उंचीच्या या टाकीजवळ रोज मुले खेळत असतात. सोमवारीही अन्सारी कुटुंबातील काही मुले या भागात खेळत होती. त्यापैकी अर्शीन परवीन ही मुलगी आणि ताचा भाऊ बराच वेळ या भागात होते. ही भावंडे टाकीजवळ गेली. नेमकी त्याचवेळी या टाकीची एक भिंत कोसळली. या भिंतीच्या मलब्याखाली दबून अर्शीनचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ब्रश करताना घाला
अर्शीनचे वडील एका खासगी कंपनीत कामगार आहे. ती आणि तिचा दोन वर्षांचा भाऊ बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास या टाकीळजवळ ब्रश करत-करत खेळत होते. मात्र, त्याच वेळी अचानक पाण्याची टाकीची भिंत कोसळली. यात अर्शीन आणि तिचा भाऊ भिंतीखाली दबले. मात्र, शेजाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यांनी कुटुंबासह तात्काळ पाण्याच्या टाकीचा मलबा हटवला. यावेळी दोन्ही बहीण-भावांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अर्शीनचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मूळ कुटुंब बिहारचे
अर्शीन परवीन ही चार वर्षांची मुलगी आपल्या आई-वडिलांसह येथे रहायची. अन्सारी कुटुंब मूळचे बिहारचे आहे. ते कामानिमित्त काही दिवसांपासून नाशिक येथे स्थायिक झाले आहेत. आता अर्शीनच्या मागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेने अन्सारी कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. अचानक टाकी कोसळल्याची कल्पना कधी केली जाऊ शकत नव्हती. त्यामुळे या दुर्घटनेनंतर त्यांनी केलेला आकांत पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली होती. (Water tank collapses on siblings; 4 year old girl killed in Nashik)
इतर बातम्याः
कांदा करणार वांदा, आयातीला शेतकरी संघटनेचा विरोध; व्यापारी-आडत्यांना धडा शिकवण्याचा इशारा
Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’https://t.co/mThHQYOyX6#Marathwada|#HyderabadMuktisangram|#FreedomFighterAnantraoBhalerao|#Aurangabad|#Maharashtra|#Razakar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021